प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

टेलिव्हिजन पाहणाऱ्यांसाठी एक मोठी खबर आहे. कारण टेलिकॉम अथॉरिटी ऑफ इंडिया यांनी आजपासून नवे टॅरिफ लागू केले आहेत. त्यानुसार ग्राहकांना नेटवर्क कॅरिज फीच्या आधारावर फक्त 130 रुपये मोजावे लागणार आहेत. यामुळे ग्राहकांना 200 फ्री चॅनल पाहण्याची संधी मिळणार आहे. तसेच ब्रॉडकास्टर 19 रुपयांचे चॅनल्स त्यांच्या बुकलेट मध्ये झळकवणार नाही आहेत. जर तुम्ही फ्री चॅनल घेतल्यास तर तुम्हाला जास्तीत जास्त 160 रुपये द्यावे लागणार आहेत. काही दिवसांपूर्वीच ट्रायचे चेअरमॅन RS शर्मा यांनी असे सांगितले की, ग्राहकांना चॅनल पाहण्यासाठी फक्त 12 रुपये द्यावे लागणार आहेत. यापूर्वी 19 रुपये ग्राहकांकडून वसूल केले जात होते.

चॅनलच्या पॅकेजमध्ये फक्त 12 रुपये किंवा त्यापेक्षा कमी पैसे असणाऱ्या चॅनलची लिस्टिंग केलेली असावी. कारण 19 रुपयांच्या चॅनलच्या किंमती 12 रुपये करण्यात आलेल्या आहेत. असे सांगितले आहे की, पहिल्या काही चॅनलसाठी ग्राहकांकडून 5 रुपये वसूल केले जात होते. त्यानंतर त्यांच्या किंमतीत वाढ करुन 19 रुपये झाले होते. एसडी किंवा एचडी चॅनल त्यांची किंमत विविध होती ते आता 19 रुपयांचे होणार आहेत. 1 मार्च पासून नवे दर लागू करण्यात आलेले आहेत. म्हणजेच आजपासून टिव्ही पाहणे स्वस्त होणार असून केबल टीव्ही आणि डीटीएचचे बिल तुम्हाला कमी येणार आहे.(1 मार्चपासून एटीएममधून निघणार नाहीत 2 हजाराच्या नोटा: ग्राहकांच्या सोयीसाठी 'इंडियन बँक'चा मोठा निर्णय)

ट्रायच्या नव्या नियमामुळे स्वस्तामधील टीव्ही चॅनल पाहणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कारण असे बऱ्याच वेळेस व्हायचे की, केबल ऑपरेटर्स एका चॅनलचे नाव सांगून अशाच पद्धतीने अन्य चॅनलचा ग्रुप बनवत. त्यामध्ये ग्राहकांना जे चॅनल पाहायचे नसायचे तेच त्यामध्ये अॅड करत. माहितीसाठी ट्रायने गेल्याच वर्षात नवी टॅरिफ पॉलिसी लागू केली होती. त्यानुसार ग्राहकांना त्यांना जे चॅनल पहायचे आहेत तेच पाहता येणार होते. त्यानुसार ग्राहकांकडून पैसे सुद्धा घेतले जात. हा नवा नियम लागू होण्यापूर्वी ग्राहकांना प्रत्येक चॅनल ब्रॉडकास्टर्सकडून पॅकेज देण्यात येत होते. त्यामुळे ग्राहकांना जे चॅनल पहायचे नाहीत त्याचे सुद्धा पैसे द्यावे लागत होते. याच दरम्यान आता अशी अपेक्षा केली जात आहे की, टॅरिफमध्ये कपात केल्यानंतर युजर्सची संख्या अधिक वाढेल.