सेकेंड हँड फोन खरेदी करतायत? जरा सावध रहा आणि ही बातमी जरुर वाचा
Representational Image (Photo Credit: PTI)

तुम्ही सेकेंड हँड फोन खरेदी करण्याचा विचार करत आहात? तर ही बातमी जरुर वाचा. तर सेकेंड हँड फोन खरेदी करणे ही काही चुकीची बाब नाही आहे. पण हा एक उत्तम आणि खिशाला परवडणारा एका पर्याय मानल जातो. दरम्यान, सेकेंड हँड फोन खरेदी करताना काही गोष्टींबद्दल सावधगिरी बाळण्याचा सल्ला मात्र नेहमीच दिला जातो. युजर्सने तपासून पहावे की, तुम्ही विकत घेणार असलेले डिवाइस चोरीचे किंवा ते योग्य पद्धतीने काम करते आहे की नाही. यामुळे तुम्हाला पुढे जाऊन कोणतीही समस्या उद्भवणार नाही.

याच संदर्भात दिल्ली पोलिसांनी एक ट्विट केले आहे. त्यांनी ट्विट मध्ये असे म्हटले आहे की, सेकेंड हँड स्मार्टफोन खरेदी करणार असाल तर Zipnet वेबसाइटवर त्याचा IEMI क्रमांक तपासून पहावा. त्याचसोबत सेकेंड हँड फोन खरेदी करताना नेहमीच सावध रहा. असे असू शकते की, त्याचा वापर चोरी किंवा एखाद्या गुन्ह्यासाठी केला असावा. या प्रकारचे रिपोट करण्यात आलेले फोन IMEMI हे #DelhiPolice #Zipnet सिस्टिमवर लिस्ट केले जाते. फोनच्या IMEI ला ब्लॉक करण्यासाठी @DoT_India सोबत शेअर केले जाते. त्यामुळे त्याचा पुढे वापर केला जाऊ नये.(Flipkart Big Saving Days Sale ला 25 जुलै पासून सुरुवात; iPhone 12, Poco X3 Pro आणि अन्य मोबाईल्सवर जबरदस्त ऑफर्स)

Tweet:

IMEI क्रमांक म्हणजे इंटरनॅशनल मोबाइल इक्विपमेंट आयडेंटिटी क्रमांक असून तो 15 अंकी असतो. प्रत्येक डिवाइसमध्ये तो वेगळा दिला गेलेला असतो. स्मार्टफोन चोरी झाल्यास नेटवर्कवर डिवाइसची ओळख पटवण्यासाठी याचा वापर केला जातो.