फ्लिपकार्ट बिग सेव्हींग डेज सेलला (Flipkart Big Saving Days Sale) 25 जुलैपासून सुरुवात होत आहे. या सेल अंतर्गत अनेक स्मार्टफोन्सवर भन्नाट डिस्काऊंट्स आणि ऑफर्स दिल्या जात आहेत. 25 ते 29 जुलै दरम्यान असलेला हा सेल फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाटी एक दिवस आधी सुरु होत आहे. फ्लिपकार्ट प्लस हे अॅमेझॉन प्राईम (Amazon Prime) सारखे असून फ्लिपकार्ट प्लस मेंबर्संना (Flipkart Plus Members) वेगवेगळ्या ऑफर्स आणि प्रॉडक्ट डिलिव्हरीमध्ये प्राधान्य दिले जाते.
येत्या काही दिवसामध्ये फ्लिपकार्टचा बिग सेव्हींग डेज सेल सुरु होणार आहे. या सेल अंतर्गत मिळणाऱ्या ऑफर्सची फ्लिपकार्टने एक झलक दाखवली आहे. यामध्ये आयसीआयसीआय बँकचे ग्राहकांना अधिक 10 टक्के डिस्काऊंट मिळेल. (Amazon Prime Day Sale 2021: iPhone 11, OnePlus 9R, Galaxy M31s या स्मार्टफोन्सवर 40% सूट; लॅपटॉप्सवर जबरदस्त डिस्काऊंट)
या सेल अंतर्गत पोको एक्स 3 प्लस हा स्मार्टफोन तुम्हाला 17,249 रुपयांना विकत घेता येईल. या स्मार्टफोनची खरी किंमत 23,999 रुपये इतकी आहे. या मोबाईलमध्ये 6जीबी रॅम+128जीबी स्टोरेज, 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आणि क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
या सेल अंतर्गत आयफोन 12 वर देखील तुम्हाला आकर्षक डिस्काऊंट मिळणार आहे. परंतु, अजून फ्लिपकार्टने आयफोन 12 ची डिस्काऊंडेट किंमत रिलीज केलेली नाही. या फोनमध्ये 6.1 इंचाचा सुपर रेटिना डिस्प्ले आणि ए-14 बायोनिक चीप मिळेल. यासोबतच आयफोन 12 मिनीवर सुद्धा डिस्काऊंट मिळणार आहे.
सॅमसंग एफ 62 हा 29,999 रुपयांना मिळणारा स्मार्टफोन सेल अंतर्गत तुम्हाला डिस्काऊंडेट किंमतीत मिळेल. या मोबाईलची 7000mhA ची बॅटरी याचे आकर्षण ठरणार आहे. यासोबतच एमआय 11 लाईट या मोबाईलवर 3500 रुपयांचा डिस्काऊंट दिला असून हा मोबाईल 20,499 रुपयांना मिळेल. या मोबाईलमध्ये 8जीबी+128जीबी स्टोरेज असून 64MP चा रियल कॅमेरा देण्यात आला आहे.
यासोबतच Infinix Note 10 Pro हा मोबाईल 16,999 रुपयांना उपलब्ध असेल. या मोबाईलमध्ये 8जीबी+256जीबी स्टोरेज दिलेला असून यामध्ये मीडियाटेकचा हेलिओ जी95 प्रोसेसर आणि 5000mAh ची बॅटरी दिलेली आहे.