खुशखबर! BSNL च्या Prepaid ग्राहकांना 'या' ठराविक प्लान्स सह मिळणार मोफत ऑनलाईन टीव्ही सेवा
BSNL (Photo Credit: Livemint)

लोकांना विरंगुळा म्हणून मोबाईल धारकांसाठी टेलिकॉम कंपन्यांनी ऑनलाईन टीव्ही सेवा दिली आहे. त्यात Airtel, Vodafone, Jio ने आपली ऑनलाईन लाईव्ह टीव्ही सेवा याआधीच सुरु केली आहे. या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी BSNL ने देखील BSNL ऑनलाईन टीव्ही सेवा सुरु केली आहे. मात्र ही सेवा BSNL च्या Prepaid ग्राहकांनाच मिळणार आहे. याआधी रिलायन्स जिओ ने Jio TV,एअरटेल ने Airtel Xstream तर व्होडाफोनने Vodafone Play ही सेवा दिली आहे. त्यात आता सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL ने BSNL TV सेवा सुरु केली आहे.

BSNL TV च्या सेवेमधून प्रीपेड धारकांना काही ठराविक प्लान्स मध्ये मोफत लाईव्ह सेवा मिळणार आहे. ज्यात ते अनलिमिटेडे मूव्हीज, व्हिडिओजचा आनंद घेऊ शकतील. अशी ऑनलाईन सेवा देणारी Jio ही भारतातील पहिली कंपनी होती. BSNL ने लॉन्च केले दोन नवे प्रीपेड प्लॅन, युजर्सला मिळणार 10GB पर्यंत डेटा

पुढील प्रीपेड प्लान्समध्ये मिळणार मोफत ऑनलाईन टीव्हीची सुविधा

BSNL च्या STV 97, STV 365, STV 399, STV 997, STV 998 आणि STV 1999 या प्रीपेड प्लान्समध्ये मोफत ऑनलाईन टीव्हीची सुविधा मिळणार आहे.

BSNL टीव्ही या अॅपमध्ये हिंदी, पंजाबी, हरियाणवी, उड़िया, भोजपुरी आणि बंगाली या भाषांमध्येही कंटेट दाखवण्याची सुविधा देण्यात आली आहे. गुगल प्ले स्टोरवर तुम्ही हा अॅप डाऊनलोड करु शकता.

हा अॅप डाऊनलोड केल्यानंतर वर सांगितलेल्या प्लान्सपैकी तुम्ही घेतलेला प्लान निवडा. यात लॉग इन केल्यानंतर युजरकडून एक OTP मिळेल. त्याने लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमची आवडती भाषा निवडून या अॅप वरुन मनसोक्त व्हिडिओ बघण्याचा आनंद घेऊ शकता.