BSNL ने लॉन्च केले दोन नवे प्रीपेड प्लॅन, युजर्सला मिळणार 10GB पर्यंत डेटा

रिलायन्स जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल यांनी त्यांच्या टॅरिफ दरात वाढ केले. त्यानुसार त्यांनी प्लॅनमध्ये सुद्धा काही बदल केले आहेत. मात्र सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल यांनी त्यांचे दोन नवे प्रीपेड प्लॅन्स लॉन्च केले आहेत.

BSNL ने लॉन्च केले दोन नवे प्रीपेड प्लॅन, युजर्सला मिळणार 10GB पर्यंत डेटा
BSNL (Photo Credit: Livemint)

रिलायन्स जिओ, वोडाफोन-आयडिया आणि एअरटेल यांनी त्यांच्या टॅरिफ दरात वाढ केले. त्यानुसार त्यांनी प्लॅनमध्ये सुद्धा काही बदल केले आहेत. मात्र सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल यांनी त्यांचे दोन नवे प्रीपेड प्लॅन्स लॉन्च केले आहेत. या प्लॅनची किंमत 98 रुपये आणि 236 रुपये आहे. युजर्सला या प्लॅनचा फायदा होणार असून 98 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वॅलिडिटी मिळणार आहे. तसेच 236 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 दिवसांची वॅलिडिटी आहे.

टेलिकॉम टॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएनएल कंपनीच्या युजर्सला प्रत्येक दिवसाला 10 जीबी डेटा मिळणार आहे. तर एकूण 28 दिवसांची वॅलिडिटी असणाऱ्या या प्लॅनमध्ये 280 जीबी पर्यंत डेटा मिळणार आहे. तर महाराष्ट्रातील काही मोजक्याच ठिकाणी 4जी नेटवर्कची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या दोन्ही प्लॅन्समध्ये कॉलिंगची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. रिपोर्टनुसार हे दोन्ही स्पेशल टॅरिफ वाउचर आहेत. मात्र हे दोन्ही प्रीपेड प्लॅन मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध करुन दिले आहेत.(Reliance JioFiber युजर्सला झटका, 90 टक्क्यांपर्यंत इंटरनेटच्या स्पीडमध्ये घट)

तसेच बीएसएनएल त्यांच्या युजर्सला काही अनलिमिटेड बेनिफिट्स असलेले प्लॅन उपलब्ध करुन देत आहे. याची सुरुवात 108 रुपयांपासून असून सर्वात महाग प्लॅन 1999 रुपयांचा आहे. बीएसएनएनलच्या 1699 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजर्सला दररोज 3GB डेटा मिळणार आहे. मात्र ही ऑफर 31 डिसेंबर पर्यंत लागू राहणार आहे. तसेच 250 मिनिटांपर्यंत डेली अनलिमिटेड कॉलिंग सुद्धा देण्यात येणार आहे. या नव्या ऑफरमध्ये युजर्सला वर्षभराच्या प्लॅनमध्ये 1 जीबी अतिरिक्त डेटा दिला जाणार आहे. कंपनीने नुकत्याच चैन्नई, तमिळनाडू येथे 1999 रुपयांचा प्लॅन पुन्हा सुरु केला आहे. 365 दिवसांच्या या प्लॅनमध्ये दररोज 3 जीबी डेटा मिळणार आहे. हा प्लॅन वर्षभरासाठी असणार असून त्यामध्ये युजर्सला SonyLIV चे फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे. त्याचसोबत 100 फ्री एसएमएस आणि कॉलिंगची सेवा सुद्धा देण्यात येणार आहे.

(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2019 11:52 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).