BSNL (Photo Credit: Livemint)

सर्वच मोबाईल कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्लान प्लाँच करत असतात. BSNL म्हणजे भारत संचार निगम लिमिटेडने कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक खास प्लान लाँच केला आहे. 2399 रुपयांच्या या प्लानमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंगसह 600 दिवसांची वैधता मिळणार आहे. आतापर्यंत कोणत्याही कंपनीचा एवढ्या मोठ्या प्रमाणात वैधता असलेला रिचार्ज उपलब्ध नाही. त्यामुळे ग्राहकांचा मोठा फायदा होणार आहे.

मात्र, या प्लानमध्ये ग्राहकांना कोणताही डेटा बेनिफिट मिळणार नाही. त्यामुळे अशा ग्राहकांसाठी हा प्लान न परवडणारा आहे. परंतु, ज्या ग्राहकांना डेटाची आवश्यकता नाही, अशा ग्राहकांसाठी हा प्लान अत्यंत फायदेशीर आहे. त्यामुळे तुम्हीही जास्त वैधता असणारा प्लान शोधत असाल, तर BSNL च्या या नवीन प्लानचा विचार तुम्ही नक्की करू शकता. (हेही वाचा - Moto G8 Power lite: भारतात लाँच झालेल्या मोटो G8 पावर लाइट स्मार्टफोन काय आहेत खास वैशिष्ट्ये)

BSNL ग्राहक 600 दिवस या अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा घेऊ शकतो. विशेष म्हणजे ग्राहकांना या प्लानमध्ये कोणताही डेटा बेनिफिट मिळत नसला तरी दररोज 100 एसएमएस पाठवण्याची सुविधा या प्लानमध्ये करण्यात आली आहे.

याशिवाय मागील आठवड्यात बीएसएनएलने Work @ Home ब्रॉडबँड प्लान च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांना 5 जीबी डेटा मोफत देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. यासाठी कंपनी ग्राहकांकडून कोणताही चार्ज आकारत नाही. लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरातून वर्क फ्रॉम होम करावे लागत आहे. त्यामुळे बीएसएनएलने ही खास ऑफर लाँच केली. मात्र, बीएसएनएलच्या या ऑफरचा लाभ ज्यांच्याकडे लँडलाईन कनेक्शन आहे, अशाच युजर्संना मिळणार आहे.