Electricity Bill On Whatsapp (Archived, Edited, Representative images)

आजकाल अनेक व्यवहार ऑनलाईन झाले आहेत. पण अनेकदा एखादे बिल येते आणि अनावधानाने ते भरायचे राहून जाते. पण हेच बिल जर तुम्ही सतत वापरणाऱ्या मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप (WhatsApp) वर आले तर? काम किती सोपे होईल नाही? तर ही सुविधा लवकरच सुरु होणार आहे. राजधानी दिल्लीच्या काही भागात ही सेवा सुरु करण्यात आली असून देशातील इतर शहरांमध्ये ती हळूहळू सुरु करण्यात येईल. तर जाणून घेऊया या सुविधेबद्दल...

दिल्लीची इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्यूशन कंपनी BSES ने सांगितले की, व्हॉट्सअॅपवर ग्राहकांना डुप्लिकेट विजेचे बिल देण्यात येईल. यापूर्वी कंपनीने अधिकृत वेबसाईट आणि अॅपच्या माध्यमातून विजेचे डुप्लिकेट बिल देण्याची सुविधा दिली होती. (विजेचे बिल कमी करण्यासाठी खास '7' ट्रिक्स!)

BSES च्या नव्या व्हॉट्सअॅप सेवे अंतर्गत आपल्या मोबाईलमध्ये BSES चा 9999919123 हा व्हॉट्सअॅप नंबर सेव्ह करा. नंबर सेव्ह केल्यानंतर #Bill नंतर स्पेस देऊन तुमचा 9 अंकी कस्टमर केयर नंबर (Customer care number) लिहून 9999919123 या व्हॉट्सअॅप नंबरवर मेसेज करा. उदा. #Bill 123456789

मेसेज पाठवल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर विजेच्या डुप्लिकेट बिलाची कॉपी पाठवण्यात येईल. सध्या या सुविधेचा लाभ फक्त साऊथ आणि वेस्ट दिल्लीतील ग्राहकांना मिळत आहे.