व्हॉट्सअॅप हे अगदी लोकप्रिय मेसेजिंग अॅप आहे. लहानांपासून ते अगदी थोरामोठ्यांपर्यंत सर्वांनाच व्हॉट्सअॅपची भारीच क्रेझ. त्यामुळे युजर्सला खूश करण्यासाठी व्हॉट्सअॅप नवनवे अपडेट्स सादर करत असतं. आता नवे व्हॉट्सअॅप स्टिकर्स युजर्ससाठी सुरु झाले आहेत. त्यामुळे चॅट करणे अधिक रंजक होणार आहे. पण हे व्हॉट्सअॅप स्टिकर्स नेमके वापरायचे कसे? पाहुया....
# व्हॉट्सअॅपच्या बिटा व्हर्जनवर हे स्टिकर्स उपलब्ध आहेत. त्यामुळे स्टिकर्स वापरण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅप अपडेट करणे गरजेचे आहे.
# व्हॉट्स अॅप अपडेट केल्यानंतर चॅट विंडोमध्ये असलेल्या इमोजीच्या आयकॉनवर क्लिक करा.
# त्यानंतर इमोजीची विंडो ओपन होईल. सर्वात शेवटी इमोजी, जीआयएफचे पर्याय असतील. त्यात सर्वात शेवटचा पर्याय व्हॉट्सअॅप स्टिकर्सचा असेल.
# त्यात काही स्टिकर्स आहेत. ते तुम्ही पाठवू शकता.
# त्याशिवाय बाजूला असलेल्या प्लस आयकॉनवर क्लिक केल्यानंतर युजर्सला वेगवेगळे स्टिकर्स डाऊनलोड करता येतील.
# my stickers मध्ये तुम्ही डाऊनलोड केलेले सर्व स्टिकर्स सेव्ह होतील. त्यापैकी नको असलेले स्टिकर्स तुम्ही डिलिट करु शकता.
# दिवाळीचे ही खास स्टिकर्स उपलब्ध आहेत.
व्हिडिओच्या माध्यमातून पाहा व्हॉट्सअॅप स्टिकर्स कसे डाऊनलोड कराल...
हे स्टिकर्स डाऊनलोड करुन तुम्ही खास शैलीत दिवाळीच्या शुभेच्छा देऊ शकता.