Photo Credit - Facebook

BoAt Users Personal Information Leak : गॅजेट कंपनी बोट (boAt) ग्राहकांसाठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. बोट कंपनीच्या ग्राहकांची वैयक्तिक माहिती लीक झाल्याचे समजत आहे. एबीपी माझा या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सुमारे 75 लाख बोट ग्राहकांचा डेटा लीक (BoAt Users Data Leak) झाल्याचं बोललं जात आहे. वैयक्तिक माहिती लिक झाल्याने सर्वांसाठीच ही धोक्याची घंटा आहे. हॅकर्सने बोट कंपनीच्या युजर्सचा पर्सनल डेटा चोरी (Data Leak) करत लीक केला आहे. बोट कंपनीच्या ग्राहकांचा डेटा डार्क वेबवर लीक (Dark Web Data Leak) झाल्याचं निदर्शनास आलं आहे. बोट कंपनीचे लाखोंच्या संख्येत भारतीय ग्राहक (Indian Consumers)आहेत. (हेही वाचा:Boat चे शानदार स्मार्टवॉच भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह धमाकेदार फिचर्सबद्दल अधिक )

सायबर गुन्हेगार या वैयक्तिक माहितीचा दुरूपयोग करू शकतात. दरम्यान, डार्क वेबवर युजर्सचा डेटा लीक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही, फेसबुक (मेटा), मायक्रोसॉफ्ट आणि अगदी गुगलच्या लाखो वापरकर्त्यांचा डेटा डार्क वेबवर लीक झाला आहे. फोर्ब्स इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 5 एप्रिल 2024 रोजी बोट कंपनीच्या लाखो युजर्सचा वैयक्तिक डेटा डार्क वेबवर आढळला आहे. लीक झालेला डेटा अतिशय संवेदनशील आहे, कारण यामध्ये ग्राहकांची वैयक्तिक माहिती आहे. (हेही वाचा:Boat Rockerz 255 Pro+ वायरलेस ईयरफोन्स भारतात लाँच, काय आहेत याची खास वैशिष्ट्ये )

लिक झालेल्या डेटामध्ये ग्राहकाचं नाव, पत्ता, फोन नंबर, ई-मेल आयडी, ग्राहक आयडी आणि इतर अनेक माहिती समाविष्ट आहेत.सध्या, या डेटा लीकबाबत बोट कंपनीकडून कोणतीही अधिकृत माहिती किंवा स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही. मात्र, शॉपी फाय हॅकरने या डोटा लीकची जबाबदारी स्वीकारली आहे. चोरीचा डेटा डार्क वेबवर अपलोड केला गेला आहे.