Bluesky Social Media App: जाणून घ्या ब्लू स्काय ॲप बद्दल, मस्कच्या X ला देणार टक्कर
BlueSky App (संग्रहित संपादित प्रतिमा)

ट्विटर या मायक्रो-ब्लॉगिंग साइटचे सह-संस्थापक आणि माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) जॅक डोर्सी (Jack Dorsey) यांनी ट्विटरला टक्कर देण्यासाठी ‘ब्लूस्काय’ (BlueSky) अॅप लाँच केले आहे. हा अॅप X  (पुर्वीचे ट्विटर आता एक्स) सारखाच मायक्रो ब्लॉगिंग अॅप आहे. Bluesky अॅप आता हा सर्वांनाच वापरता येणार आहे. एका दिवसात, Bluesky ने जवळजवळ 800,000 नवीन वापरकर्ते मिळवले आणि एकूण 4 दशलक्ष साइनअप जोडले. यामुळे हा अॅप आता X टक्कर देण्यासाठी आता सज्ज झाला आहे.  (हेही वाचा - LinkedIn to Introduce Gaming: लवकरच 'लिंक्डइन' या लोकप्रिय जॉब सर्च प्लॅटफॉर्मवर खेळू शकाल गेम्स; युजर्सनी व्यासपीठावर अधिक वेळ घालवण्यासाठी कंपनीची भन्नाट आयडिया)

ब्लूस्कायमध्ये, वापरकर्ते 256 शब्दांच्या पोस्ट शेअर करू शकतात. पोस्टसोबत फोटो जोडण्याचाही पर्याय हा दिला आहे. वापरकर्ते त्यांचे खाते शेअर, म्यूट किंवा ब्लॉक करू शकतात. ट्विटर प्रमाणेच यात बुकमार्क, मॉनिटरिंग लाईक्स, पोस्ट मॉडिफाय, कोट पोस्ट, डायरेक्ट मेसेज, हॅशटॅग सारखे फीचर्स उपलब्ध असतील. Bluesky हे ट्विटरचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जॅक डोर्सी यांच्या संकल्पनेतून तयार केलेले विकेंद्रित सोशल ॲप आहे आणि Twitter च्या सोबतच त्याची निर्मीती करण्यात आली होती. सोशल नेटवर्कमध्ये अल्गोरिदमिक निवड, फेडरेटेड डिझाइन आणि कम्यूनिटी-फिचर्स कंट्रोलसह Twitter सारखा यूझर्स इंटरफेस आहे.

Bluesky म्हणजे काय?

Bluesky एक ओपन सोर्स फ्रेमवर्क इन-हाउस, AT प्रोटोकॉल वापरत आहे, याचा अर्थ कंपनीच्या बाहेरील लोकांना ते कसे तयार केले जाते आणि काय विकसित केले जात आहे याबद्दल पारदर्शकता असणार आहे. डोरसी यांनी 2019 मध्ये Bluesky प्रोजेक्ट सुरु केला होता, त्यावेळी ते Twitter चे CEO होते.पण इलॉन मस्कने प्लॅटफॉर्म विकत घेतल्यानंतर डोर्सीने मस्कच्या नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करण्यासाठी ब्लू स्कायचे काम पुन्हा सुरु केले होते. डोर्सी ट्विटरमधून बाहेर पडल्यानंतर गेल्यावर्षी ब्लु स्काय अॅप सुरु केले होते. BlueSky ला गेल्यावर्षी  13 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी गेल्या वर्षी मिळाला होता.  आता हे अॅप सर्वांसाठी खुले करण्यात आले असून त्याला सुरुवातीलाच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

आगामी काळात ट्विटरला अनेक मायक्रो ब्लॉगिंग साइट्सशी स्पर्धा करावी लागणार आहे फेसबुकचे थ्रेड्स हे सध्या त्यांच्या समोरचे सर्वात मोठे आवाहन आहे. तर Mastodon आणि भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Koo आधीच अनेक देशांमध्ये वापरकर्त्यांची पसंती बनत आहेत. अशा परिस्थितीत ब्लूस्काय सोबतच आणखी अनेक प्लॅटफॉर्म्सही लॉन्च होण्याच्या तयारीत आहेत.