BGMI गेम आता भारतात Google Play Store वर प्रीलोडसाठी उपलब्ध; 29 मे पासून Battlegrounds Mobile India खेळू शकतात
BGMI Mobile India/facebook

व्हिडिओ गेम Battlegrounds Mobile India (BGMI)आता गूगल प्ले स्टोअरच्या प्री लोड मध्ये युजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. 29 मे पासून तो उपलब्ध होणार आहे. असं आज कंपनीकडून सांगण्यात आले आहे. साऊथ कोरियन कंपनी Krafton कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, डेव्हलर्प्सकडून या मोबाईल गेम ची लिंक डाऊनलोड साठी iOS users ना 29 मे पासून देशात उपलब्ध होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. कंपनीने म्हटले आहे की

BGMI वर सरकारने वर्षभरापूर्वी बंदी घातली होती परंतू आता या गेमसाठी लोकं प्रतिक्षेत आहेत आणि ते पाहूनच या खेळाची उपलब्धता दिली जाणार आहे.

Sean Hyunil Sohn, CEO, Krafton Inc India यांनी प्रतिक्रिया देताना BGMI हा प्रिलोड साठी उपलब्ध करून दिला जाणार आहे. युजर्सना चांगला अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे असे म्हटले आहे. BGMI हा गेम पुन्हा आणण्यापूर्वी त्याची कठोर ट्रायल करण्यात आली आहे. 3 महिने त्याची ट्रायल झाल्यानंतर सरकारने हा गेम पुन्हा आणण्यास परवानगी दिली आहे. नक्की वाचा: BGMI To Resume In India: BGMI चाहत्यांसाठी आनंदाची बातमी, बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया गेम वर्षभराच्या बंदीनंतर भारतात पुन्हा होणार लॉन्च .

गेम अपडेट मध्ये नवा मॅप असणार आहे. भारत सरकारने सर्वप्रथम देशात क्राफ्टनच्या PUBG ऑफर करणाऱ्या Marquee वर बंदी घातली. Krafton ने नंतर मे 2021 मध्ये BGMI गेम लॉन्च करण्याची घोषणा केली. त्यानंतर भारत सरकारने Google आणि Apple ला माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या कलम 69A अंतर्गत त्यांच्या संबंधित ऑनलाइन स्टोअरमधून BGMI गेमिंग अॅप ब्लॉक करण्याचे आदेश दिले होते.