Asus ने 'आसूस झेनबुक प्रो ड्युओ' लॅपटॉपची निर्मिती केली असून हा जगातील पहिला दोन स्क्रिन असणारा लॅपटॉप आहे. 'कंप्यूटेक्ट 2019' या परिषेदत हा लॅपटॉप सादर करण्यात आला. या लॅपटॉपमध्ये असणाऱ्या दुसऱ्या स्क्रिनला की-बोर्ड इतकी जागा देण्यात आली आहे. मुख्य स्क्रीनच्या एक्सटेंडेड डिस्प्लेसारखी ही स्क्रीन असणार आहे. भारतात हा लॅपटॉप सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात लॉन्च होणार आहे.
या लॅपटॉपमध्ये 15.6 इंचाची 4 के यूएचडी ओएलडी एचडीआर सपोर्टिंग टच स्क्रीन देण्यात आली आहे. यामध्ये तुम्ही कोणतीही विंडो स्क्रीन ड्रॅग करू शकता. मुख्य स्क्रीनमध्ये आसूसने नॅनो एज डिझाईनचा वापर केला आहे. याशिवाय लॅपटॉपमध्ये नंबर पॅड डायल फंक्शन देण्यात आले आहे. तसंच या लॅपटॉपच्या की बोर्डमध्ये पाम रेस्ट असणार आहे. यामुळे टायपिंग करणे सुसह्य होणार आहे.
या लॅपटॉपमध्ये अलेक्सा व्हॉईस सपोर्ट असणार आहे. लॅपटॉपमध्ये 9 जनरेशन इंटेल कोअर आय 7 (9750 एच) किंवा आय 9 (9980 एचके) प्रोसेसर असण्याची शक्यता आहे. लॅपटॉपमध्ये 32 जीबी डीडीआर 4 रॅम असणार आहे. मात्र या लॅपटॉपमध्ये एसडी कार्ड सपोर्ट करत नाही.