Whatsapp-Sticker (Photo Credits: Whatsapp Blog)

WhatsApp त्यांच्या युजर्सला खुश ठेवण्यासाठी प्रत्येकवेळी नवे फिचर्स घेऊन येतात. त्यानुसार व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी अॅनिमेडेट स्टिकर्स, व्हॉट्सअॅप वेबसाठी डार्क मोड आणि क्यू आर कोड्स, KaiOS साठी स्टेटस सुद्धा उपलब्ध करुन दिले आहेत. या न व्या अपडेटमध्य यापुर्वीपेक्षा अधिक दमदार फिचर्स युदर्जसाठी रोलआउट केले आहेत. येत्या काही आठवड्यात हे सर्व फिचर्स भारतीय युजर्सला सुद्धा उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. मात्र आता व्हॉट्सअॅपवरील अन्य फिचर्सबाबत येथे अधिक जाणून घ्या. (WhatsApp वर तुम्ही जास्त कोणात्या व्यक्तीसोबत बोलता हे पाहण्यासाठी  'या' ट्रिक्स वापरा)

व्हॉट्सअॅप स्टिकर्टचा वापर  युजर्स गेल्या काही काळापासून करत आहेत. मात्र नव्या अॅनिमेडेट स्टिकर्ससह कंपनी युजर्सला चॅटिंग करताना अधिक मजा यावी यासाठी अधिक शानदार बनवणार आहे. कंपनीचे असे म्हणणे आहे की, नवे स्टिकर्स रोलआउट केल्यानंतर युजर्स त्यांचे फ्रेंड्स किंवा फॅमिलीसोबत अधिक उत्तम पद्धतीने जोडले जाऊ शकतात.  व्हॉट्सअॅप स्टिकर्स एकमेकांसोबत कनेक्ट होण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

स्टिकर्ससह व्हॉट्सअॅपने क्यूआर कोड फिचर बाबत सुद्धा घोषणा केली आहे. या फिचरच्या मदतीने युजर्सला नवे कॉन्टॅक्ट सेव्ह करता येणार आहेत. आता युजर्सला क्यूआर कोड पाठवून क्रमांक आपल्या मोबाईल मध्ये जोडता येणार आहेत. तर या वर्षाच्या सुरुवातीला व्हॉट्सअॅपने डार्क मोड लॉन्च केले होते. आता कंपनी हेच डार्क मोड फिचर लॅपटॉप किंवा डेस्कटॉपसाठी वापरण्यात येणाऱ्या WhatsApp Web साठी सुद्धा उपलब्ध करुन देणार आहे. (WhatsApp वरील डिलिट झालेले फोटो पुन्हा डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या ट्रिक्स)

व्हॉट्सअॅपने नुकतेच ग्रुप कॉलिंगसाठी एकावेळी आठ जणांसोबत बातचीत करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कंपनीने व्हिडिओ कॉलिंगच्या फिचरमध्ये ही बदल करण्याचा याच्या माध्यमातून प्रयत्न केला आहे. युजर्सला व्हिडिओ कॉलिंगच्या वेळी स्वत:सह अन्य व्यक्तिला सुद्धा फुल स्क्रिनवर पाहू शकणार आहे. आणखी एक महत्वाचे म्हणजे कंपनीने KaiOS युजर्ससाठी स्टेट्स उपलब्ध केले आहे. KaiOS युजर्स सुद्धा Android आणि iOS युजर्ससारखे स्टेट्स अपडेट करु शकणार आहेत. हे स्टेट्स 24 तासानंतर आपोआप डिलिट होणार आहे.