ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म अॅमेझॉन (Amazon) ने धमाकेदार सेलची घोषणा केली आहे. Amazon Wow Salary Days Sale 5 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे. या सेल अंतर्गत एलजी (LG), बॉश (Bosch), बजाज (Bajaj), बोस (Bose), सोनी (Sony), डेल (Dell), श्याओमी (Xiaomi) यांसह अनेक ब्रँड्सवर भरगोस सूट मिळत आहे. तसंच या सेलमध्ये नो-कॉस्ट ईएमआय (No-Cost EMI) चा पर्याय आणि एक्सचेंज ऑफर (Exchange Offer) देखील दिली जात आहेत. (Amazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर)
एचएसबीसी क्रेडिट कार्डवरुन (HSBC Credit Card) कमीत कमी 10 हजार रुपयांची खरेदी केल्यास 10% ची सूट दिली जात आहे. त्याचबरोबर 1500 रुपयांचा अधिक डिस्काऊंट दिला जात आहे. या सेलमधून खरेदी केल्यास मोठ्या उपकरणांवर 50% ची सूट दिली जाईल. व्हाईट-वेस्टिंगहाउस (White-Westinghouse), तोशिबा (Toshiba) आणि फॉक्सस्की (Foxsky) यांसारख्या ब्रँडच्या वॉशिंग मशीन (Washing Machine)7,499 रुपयांना उपलब्ध आहे.
एलजी (LG), सॅमसंग (Samsung), व्हर्लपूल (Whirlpool), हायर (Haier), गोदरेज (Godrej)या ब्रँड 35% पर्यंत सूट दिली जात आहे. तर वोल्टास (Voltas), डिकिन (Daikin), एलजी (LG), गोदरेज (Godrej), Sanyo या ब्रँडच्या एसीवर 40% ची सूट मिळत आहे.
सेलमध्ये टीव्ही खरेदीवर 30% डिस्काऊंट दिला जात आहे. 4K टीव्हीवर 30% ची सूट दिली जात आहे. बोट (Boat), जेबीएल (JBL), एमआई (Mi)आणि अन्य साऊंटबारवर 30% सूट मिळत आहे. डेटफोन आणि स्पीकर वर 50% चे डिस्काऊंट मिळत आहे. बोस (Bose), सोनी (Sony), हरमन कार्दोन (Harman Kardon) च्या हेडफोन खरेदीवर 9 महिन्यांपर्यंत नो कॉस्ट ईएमआय देखील दिला जात आहे. याशिवाय बोट, सोनी, जेबीएल ब्रँडच्या वायरलेस हेडफोनवर 50% सूट दिली जात आहे. कंम्प्युटिंग डिव्हाईस आणि एक्सेसरीजच्या खरेदीवर 50% ची सूट मिळत आहे. विशेष म्हणजे लॅपटॉप वर देखील 35% सूट मिळत आहे. तर गेमिंग एसेंशिअल वर 40% आणि हार्ड ड्राईव्ह, एसएसडीवर 40% ची सूट ई-टेलर द्वारे दिली जात आहे.