Amazon आणि Flipkart वर लवकरच सुरु होणार सेल, ग्राहकांना डिस्काउंटसह मिळणार तगडी ऑफर
Logos of Flipkart and Amazon (Photo Credits: Twitter)

सणाचे दिवस जवळ येत असल्याने प्रत्येक वर्षात ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट्स Amazon आणि Flipkart येथे लवकरच सेल सुरु होणार आहे. या दोन्ही वेबसाईट्सवर सेलची घोषणा करण्यात आली आहे. तर अॅमेझॉनवर Great Indian Festival Sale आणि फ्लिपकार्टवर The Big Billion Days सेल सुरु होणार आहे. परंतु हा सेल कधी सुरु होणार याबद्दल अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. मात्र या वेळी डिस्काउंटसह ग्राहकांना भरपूर ऑफर्स मिळणार असल्याचे दिसून आले आहे.(Google Pay ने सुरु केली नवी सर्विस, युजर्सला कार्ड पेमेंट करणे होणार सोप्पे)

अॅमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना HDFC बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के इंन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे. तर फ्लिपकार्टवर SBI,ICICI,HDFC सारख्या बँकांसह मिळून No Cost EMI सुविधा मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या सेलवर इलेक्ट्रॉनिक्स आणि एक्ससरिजवर 80 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त एक्सचेंज ऑफर्स आणि प्रत्येक दिवशी नवी डिल्स मिळणार आहे. तर अॅमेझॉनवर 70 टक्क्यांपर्यंत सूट दिला जाणार असल्याचे ही म्हटले आहे. टीव्ही आणि अप्लायंसेसवर सुद्धा या दोन्ही वेबसाईटवर शानदार सूट दिली जाणार आहे.(Facebook वर आपोआप व्हिडिओ प्ले होतात? 'या' पद्धतीने ऑफ करा AutoPlay फिचर)

फ्लिपकार्टवर सेलच्या वेळी प्रत्येक दिवशी सकाळी 8 वाजता, संध्याकाळी 4 वाजता आणि रात्री 12 वाजता Crazy Deals चे आयोजन असणार आहे. तेथे टॉप ब्रॅन्ड्स, मोबाईल आणि टीव्हीवर अतिरिक्त डिस्काउंट ऑफर केला जाणार आहे. तसेच फ्लिपकार्टवर Flipkart Plus मेंबर्स आणि अॅमेझॉनवर प्राइम मेंबर्ससाठी सेल हा अन्य ग्राहकांच्या तुलनेत आधी सुरु होणार आहे.

यापूर्वी फ्लिपकार्टवरील 'बिग सेव्हिंग डेज' सेल 6 ते 10 ऑगस्टपर्यंत सेल ठेवण्यात आला होता. या सेलमध्ये मोबाईल्स, ब्लूटुथ, स्पीकर्स यांसारख्या गॅजेट्ससह घरगुती वापरातील वस्तू, कपडे यांसारख्या गोष्टींवर देखील जबरदस्त ऑफर्स दिली होती. तसेच सेलमध्ये ICICI क्रेडिट कार्ड आणि Citi बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डधारकांना विशेष सूट दिली गेली होती. ती म्हणजे या सेलमध्ये कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर त्यांना 10% त्वरित डिस्काउंट ही दिला गेला होता.