Google Pay ने सुरु केली नवी सर्विस, युजर्सला कार्ड पेमेंट करणे होणार सोप्पे
Google Pay (Photo Credits-Twitter)

गुगल (Google) कडून सोमवारी युजर्सला गुगल पे (Google Pay) साठी विविध सुविधा देण्यासाठी NFC बेस्ड टोकनाइजेशन सर्विस सुरु करण्याचे आवाहन केले आहे. कंपनीने ही सर्विस सर्व प्लॅटफॉर्मवर रोलाउट केली आहे. गुगल पे टोकनाइजेशन सर्विससाठी Visa आणि बँकिंग पार्टनरसोबत मिळून काम करणार आहे. सोप्प्या शब्दात सांगायचे झाल्यास, गुगल पे युजर्सला आता स्वॅपिंग शिवाय आपले डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेमेंट करता येणार आहे. युजर्सला आपल्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डचे डिटेल्स फिजिकली शेअर करावे लागणार नाही आहेत. कार्ड संबंधित मोबाईल क्रमांवर जोडलेल्या सुरक्षित डिजिटल टोकनच्या माध्यमातून पेमेंट केले जाऊ शकते. या व्यतिरिक्त Google Pay युजर्सला टॅप टू पे (Tap-To-Pay) फिचरचा वापर करुन नियर फील्ड कम्युनिकेशन (NFC) इनबेल्ड प्वॉइंट ऑफ सेल्स (POS) टर्मिनलवप पेमेंट करता येणार आहे. त्याचसोबत ऑनलाईन पेमेंटची सुद्धा सुविधा असणार आहे.

गुगलचे नवे पेमेंट फिचर सध्या फक्त Axis आणि SBI कार्ड होल्डर्ससाठी उपलब्ध करुन दिले आहे. पण लवकरच गुगल पे नवे फिचर देशातील अन्य बँकांच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डसाठी उपलब्ध होणार आहे. गुगलच्या या सर्विसचा वापर करण्यासाठी युजर्सला स्मार्टफोनवर टॅप अॅन्ड पे फिचर Enable करावे लागणार आहे. यासाठी युजर्सला आपले कार्ड डिटेल्स देऊन वन टाइम सेटअप करावे लागणार आहे. युजर्सला गुगल पे कार्डवर अॅड करण्यासाठी बँकेकडून ओटीपी येणार आहे. या पद्धतीने रजिस्ट्रेशननंतर फिचरला NFC इनेबल्ड टर्मिनल्सवर पेमेंट करण्यासाठी वापर केला जाऊ शकतो.(Apple कंपनी 23 सप्टेंबरला भारतात लॉन्च करणार Online Store; युजर्सला होणार फायदा)

गुगल पे बिझनेस हेड Sajith Sivanandan यांनी असे म्हटले की, आम्हाला अपेक्षा असून टोकनाइनेशन फिचरमुळे युजर्सला सुरक्षित पद्धतीने देवाणघेवाण करता येणार आहे. त्याचसोबत सर्विसचा अधिक विस्तार ऑनलाईनसह ऑफलाइन पद्धतीने सुद्धा केला जाणार आहे. सध्याच्या काळात हे फिचर फक्त ऑनलाईन पेमेंटसाठीच उपलब्ध आहे. कंपनीच्या मते, स्मार्टफोनच्या टॅप अॅन्ड पे फिचरमध्ये युजर्सला एकदाच आपल्या कार्डचे डिटेल्स रजिस्टर करावे लागणार आहेत. त्यानंतर ओटीपीच्या माध्यमातून पेमेंट होणार आहे. कंपनीच्या मते यामुळे बँकेच्या फसवणुकीचे प्रकारावर नियंत्रण मिळवण्यास मदत होईल.