Facebook वर आपोआप व्हिडिओ प्ले होतात? 'या' पद्धतीने ऑफ करा AutoPlay फिचर
Facebook Logo

सोशल मीडिया साइट फेसबुक आणि त्याच्या अॅपवर दाखवले जाणारे काही व्हिडिओ आपोआ प्ले होतात. या पद्धतीचे व्हिडिओ फेसबुकचे पेज लोड होताच किंवा स्क्रोल करताना व्हिडिओ प्ले होतात. या पद्धतीने अॅप आणि प्लॅटफॉर्मवर युजर्सला उत्तम अनुभव मिळतो. परंतु सर्व युजर्सला ऑटोप्ले फिचर आवडेल असे नाही. कारण काही युजर्सला हे फिचर आवडत नसल्याने ते त्रस्त होतात. ऐवढेच नाही तर ऑटोप्ले व्हिडिओमुळे अधिक डेटा सुद्धा खर्चिक होतो. काही वेळेस असे सुद्धा होते की, युजर्सला न पहायचे असलेले व्हिडिओ सुद्धा प्ले होतात. त्यामुळे तुम्हाला ऑटोप्ले ऑफ करायचे असल्यास काही सोप्या स्टेप्स फॉलो करु शकता.

फेसबुकवर आपण खुप गोष्टी पाहतो तर त्यावेळी जाहीराती किंवा काही व्हिडिओ प्ले केल्या जातात. यामुळे आपल्याला एखादी महत्वाची माहिती पहायची असल्यास चटकन स्क्रोल झाल्याने ती व्हिडिओ प्ले झाल्यानंतर पुन्हा शोधावी लागते. त्यामुळे या समस्येपासून तुम्हाला सुटका हवी असल्यास या काही सोप्प्या ट्रिक्सचा वापर करा.(Facebook सोबत लिंक करता येणार Instagram अकाउंट, कंपनीने केले कंन्फर्म)

-सर्वात प्रथम फेसबुक पेजच्या टॉपला असणाऱ्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या ड्रॉप-डाउन मॅन्यूच्या येथे जा.

-त्यानंतर Settings and Privacy वर क्लिक करुन त्यात Settings चा ऑप्शन निवडा.

-असे केल्यानंतर लेफ्ट-हँन्ड मॅन्यू येथून Videos वर क्लिक करुन ऑप्शंस टॉगल मध्ये व्हिडिओ ऑटोप्ले ऑफ करु शकतो.

>>iOs अॅपसाठी

-फेसबुक अॅप सुरु केल्यानंतर स्क्रिन वर खाली दिलेल्या मेन्यू बटणवर क्लिक करा.

-Settings and Privacy मध्ये जाऊन Settings ऑप्शन निवडा.

-त्यानंतर स्क्रॉल केल्यानंतर Media And Contacts ऑप्शन दाखवले जाईल येथे Vidoes and Photos वर टॅप करा.

-येथे दिसणाऱ्या AutoPlay ऑप्शन ऑफ करु शकतो.

तर अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन युजर्सने सुद्धा याच टीप्स फॉलो करा. परंतु AutoPlay वर टॅप केल्यानंतर Never Autoplay Vidoes चा ऑप्शन निवडा.