फेसबुककडून युजर्सला उत्तम अनुभव येण्यासाठी नवे-नवे अपडेट्स जाहीर करत आहेत. दरम्यान आता फेसबुकने Instagram अकाउंट लिंक करण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. फेसबुकचे या फिचर्स संदर्भात गेल्या काही काळापासून काम करण्यात येत असते. त्यामुळे लाईव्ह झाल्यानंतर फेसबुक अंकाउटवर इंन्स्टाग्राम स्टोरी सुद्धा डिस्प्ले केले जाऊ शकते. कंपनीचे हे नवे फिचर्स अशा युजर्सला फायदेशीर ठरणार आहे जे फेसबुकसह इन्स्टाग्रामवर अधिक अॅक्टिव्ह असतात. या व्यतिरिक्त फेसबुकने इंन्स्टाग्राम अकाउंट लिंक झाल्यानंतर युजर्सला ट्रॅफिक इंप्रुव्ह करण्यास मदत होणार आहे.
सोशल मीडिया एक्सपर्ट Matt Navarra यांनी फेसबुकच्या नव्या फिचर्स बद्दल खुलासा केला आहे. फोटो शेअरिंग अॅपच्या नव्या फिचरचा स्क्रिनशॉर्ट Navarra यांनी त्यांच्या ट्वीटरवर पोस्ट केला आहे. इंन्स्टाग्राम वरील काही निवडक युजर्सला कंपनीकडून इंन्स्टाग्राम स्टोरी फेसबुक सोबत लिंक करण्याचे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. फेसबुकचे प्रवक्ता यांच्याकडून सु्द्धा या नव्या फिचर्स बद्दल कंन्फर्म केले आहे. इंन्स्टाग्राम स्टोरीला फेसबुकवर शो करण्याचा ऑप्शन उपलब्ध करुन दिला आहे. त्याचसोबत युजर्सला फेसबुवर कोणी कोणी त्यांची इंन्स्टाग्रामवरील स्टोरी पाहिली आहे ते सुद्धा कळू शकणार आहे.(Facebook:पाकिस्तान नियंत्रित 400 फेक अकाऊंट्स, इन्स्टाग्राम पेज, ग्रुप्सवर फेसबुकची कारवाई)
The Verge च्या रिपोर्टनुसार फेसबुक कडून एक अन्य फिचरवर सुद्धा काम केले जात आहे. त्यामध्ये युजर्सला Facebook Messenger ला Instagram Messages सोबत लिंक करता येणार आहे. इंन्स्टाग्राम युजर्सने जर त्यांच्या अकाउंटवरुन फेसबुक लिंक केल्यास त्याला इंन्स्टाग्रामवरील स्टोरी फेसबुकवर सुद्धा पाहता येणार आहे.