Facebook:पाकिस्तान नियंत्रित 400 फेक अकाऊंट्स,  इन्स्टाग्राम पेज,  ग्रुप्सवर फेसबुकची कारवाई
Facebook Logo

फेक अकाऊंट्स (Fake Accounts) उघडून सोशल मीडियावर वावरणाऱ्यांना फेसबुकने मोठा दणका दिला आहे. बनावट फेसबुक अकाऊंट्स (Fake Accounts), पेज, ग्रुप आणि इन्स्टाग्राम अकाऊंट्स (Instagram Accounts) थेट हटविण्याची कारवाई कंपनीने केली आहे. फेसबुकने (Facebook) याबाबत माहिती देताना सांगितले की कंपनीने कारवाई करत 453 अकाउंट्स 103 पेज, 78 ग्रुप आणि 107 इंस्टाग्राम उकाऊंट्स हटविण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ही सर्व अकाऊंट्स आणि पेज पाकिस्तानमधून संचलित केली जात असल्याचेही माहितीही फेसबुकने दिली आहे.

फेसबुकने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानातून चालवली जात असलेली अकाऊंट्स भारतात संभ्रम निर्माण करणारी आणि चुकीची, दिशाभूल करणारी माहिती पसरवत होती. यातील बहुतांश अकाऊंट्स खोट्या नावांनी उघडण्यात आली होती. यामध्ये हे लोक भारतातील असल्याचाही दावा करण्यात आला होता. अशा पद्धतीचा कंटेट पोस्ट करत असताना या मंडळींनी भारतीय लष्ककराचेही काही फॅन ग्रुप्स तयार केले होते. तसे पेज आणि ग्रुपही मॅनेज केले जात होते.

फेसबुकने आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, हे सर्व पेज, ग्रुप, फॅन पेज प्रामुख्याने हिंदी आणि इंग्रजी भाषेत होती. यात स्थानिक बातम्या आणि वर्तमानातील घटना आणि काही मीम्स पोस्ट केले जात होते. या पेजवरुन भारत पाकिस्तान यांच्यातील राजकीय मुद्द्यांवरही माहिती दिली जात होती. तसेच, यात भारत चीन, परराष्ट्रस संबंध, रणनिती आणि राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले जात असे. कोरोना व्हायरस संक्रमणावर पावल टाकण्याबाबतही इथे गंभीर मुद्दे उपस्थित केले जात होते.

कंपनीन आपल्या अंतर्गत चौकशीत काही नेटवर्क संशयास्पद आढळली. ज्यांचा व्यवहार अप्रामाणिक असल्याचे दिसून आले. फेसबुकने पुढे म्हटले आहे की, अशा प्रकारची कारवाई ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या आधीही आम्ही अशी पावले टाकली आहेत.