Amazon Prime Day sale 2020: 'या' टॉप 5 स्मार्टफोन दिली जातोय भारी डिस्काउंट, जाणून घ्या ऑफर
Amazon Prime Day 2020 Shopping Festival (Photo Credits: Amazon India)

Amazon Prime Day Sale 2020 साठी आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवस ग्राहकांना स्मार्टफोन खरेदी करण्याची उत्तम संधी मिळाली असून भारी डिस्काउंटर ऑफर्स सुद्धा दिली जात आहे. अॅमेझॉन सेलमध्ये असे काही स्मार्टफोन आहेत ज्यावर तगडी सूट ग्राहकांना मिळणार आहे. आजपासून सुरु झालेला सेल उद्या (7ऑगस्ट) पर्यंत असणार आहे. सेलमध्ये Huawei कंपनीने नुकताच त्यांचा स्मार्टफोन Y9 भारतात लॉन्च केला आहे. यामध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा आणि फुल स्क्रिन डिस्प्ले दिला गेला आहे. फोन ग्राहकांना 19,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. स्मार्टफोन 1,500 रुपयांच्या एक्सचेंज बोनस अंतर्गत खरेदी करता येणार आहे.

Vivo कंपनीने ही त्यांचा दमदार कॅमेरा असलेला स्मार्टफोन ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिला आहे. या स्मार्टफोनची किंमत 30,990 रुपये आहे. परंतु अॅमेझॉन सेलमध्ये त्यावर जवळजवळ 6 हजार रुपयांची सूट दिली जाणार आहे. त्यामुळे फोन 24,990 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्याचसोबत कंपनीकडून 2,500 रुपयांचा डिस्काउंट सुद्धा दिला जाणार आहे.

Samsung Galaxy M31 या स्मार्टफोनवर अॅमेझॉन सेलमध्ये डिस्काउंट देऊन किंमत 16,499 रुपये आहे. सॅमसंग गॅलेक्सी एम31 मध्ये 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज असणाऱ्या मॉडेलची किंमत 19,990 रुपये आहे. तर 6GB+64GB मॉडेलची किंमत 16,990 रुपये आणि 6GB+128GB मॉडेलची किंमत 17,990 रुपये आहे. हा स्मार्टफोन ओशियन ब्लू आणि स्पेस ब्लॅक रंगात उपलब्ध आहे.(Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्ट वर आजपासून सुरु झालेल्या बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये 'या' स्मार्टफोन्सवर मिळतायत भन्नाट ऑफर्स) 

Oppo A12 स्मार्टफोन अॅमेझॉन सेलवर 11,490 रुपयात खरेदी करता येणार आहे. ओप्पो A12 भारतात दोन स्टोरेज ऑप्शनमध्ये लॉन्च करण्यात आला होता. फोनच्या बेसिक वेरियंटमध्ये 3GB रॅम आणि 32GB इंटरनल मेमोरी दिली आहे. तर दुसऱ्या वेरियंटमध्ये 4GB+64GB स्टोरेज दिला आहे. हा फोन ब्लू आणि ब्लॅक अशा दोन वेरियंटमध्ये उपलब्ध होणार आहे.