Amazon Great Indian Festival Sale 2021 ला 4 ऑक्टोबर पासून सुरुवात; 'या' ब्रँडच्या प्रॉडक्ट्सवर मिळणार भरगोस सूट
Amazon Great Indian Festival Sale 2021 (Photo Credits: Amazon India)

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेल (Amazon Great Indian Festival Sale) 2021 ला 4 ऑक्टोबर पासून सुरुवात होणार आहे. व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत ई-कॉमर्स जाएंटने यासंदर्भातील माहिती दिली. मागील वर्षाप्रमाणे यंदाही हा सेल महिनाभर चालणार आहे. तसंच नेहमीप्रमाणे प्राईम मेंबर्संना डिस्काऊंट, कॅशबॅक यांसारख्या ऑफर्सचा लाभ आधी घेता येणार आहे. या सेलमध्ये खरेदी करण्यासाठी एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) क्रेडिट (Credit) आणि डेबिट कार्डचा (Debit Card) वापर केल्यास 10 टक्क्यांचा इन्स्टंट डिस्काऊंट (Instant Discount) मिळेल. तसंच EMI पर्यायवरही ही ऑफर लागू असेल.

अॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टीव्हल सेलमध्ये स्मार्टफोन्स, ईयरबड्स, टॅबलेट्स, लॅपटॉप, फॅशन, अॅक्सेसरीज आणि इत्यादी प्रॉडक्ट्सवर भरगोस सूट मिळणार आहे. यासाठी खास मायक्रो साईट्स देखील सेट करण्यात आल्या आहेत. (Flipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत)

या सेलमध्ये स्मार्ट टीव्ही, इको फायर, किंडल डिव्हाईस, अॅलेक्सा या विविध डिव्हाईसेसवर भरगोस सूट मिळणार आहे. त्याचबरोबर या सेलमध्ये नव्याने लॉन्च झालेले 1000 नवीन प्रॉडक्ट्स मिळणार आहेत. यात सॅमसंग, फॉसिल, वनप्लस, सोनी, शाओमी, अॅपल लिनोव्हा, एचपी, बोट यांसारख्या ब्रँडचा समावेश आहे.

Amazon Great Indian Festival Sale 2021 (Photo Credits: Amazon India)
Amazon Great Indian Festival Sale 2021 (Photo Credits: Amazon India)

Amazon Pay ICICI Bank credit card खरेदी करणाऱ्या ग्राहकांना 5 टक्के रिव्हार्ड पॉईंट्स मिळणार आहेत. यंदाच्या वर्षी या सेलमध्ये 75000 लोकल शॉप्स देखील सहभागी झाले आहेत. दरम्यान, 7 ऑक्टोबरपासून सुरु होणारा Flipkart's Big Billion Days Sale ला चांगलीच टक्कर देणारा हा सेल ठरणार आहे.