Flipkart Big Billion Days Sale 2021: लवकरच येत आहे फ्लिपकार्टचा 'बिग बिलियन डेज सेल'; Motorola, Oppo, Poco, Realme, Samsung, Vivo सह अनेक फोन्सवर मिळणार बंपर सवलत
Flipkart (Photo Credits: File Photo)

ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टने 'फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल' ची घोषणा केली आहे. कंपनीने यासाठी एक खास मायक्रोसाइड देखील जारी केले आहे व या सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर आणि सूटबाबत इथे माहिती देण्यात आली आहे. कंपनीने या सेलची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही. परंतु काही अहवालांनुसार, हा सेल 24 सप्टेंबरपासून सुरू होईल आणि 1 ऑक्टोबरपर्यंत चालेल. फ्लिपकार्टच्या या वार्षिक सेलमध्ये तुम्हाला नवीन फोनवर मोठ्या सल्वालाती मिळती. काही लोकप्रिय फोनही यात समाविष्ट करण्यात आले आहेत. यामध्ये तुम्हाला Pixel 4a, Poco X3 Pro, Moto Edge 20 Fusion, Asus Rog Phone 3 आणि Infinix Hot 10s वर सूट मिळू शकते. याशिवाय, तुम्ही क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 1000 रुपयांची सूट देखील मिळवू शकता.

फ्लिपकार्टने अद्याप सेलची तारीख आणि त्यात उपलब्ध असलेल्या ऑफर्सचा अधिकृतरीत्या खुलासा केलेला नाही, एक Reveal Calendar शेअर केले आहे, ज्यामध्ये त्या काळात लॉन्च होणाऱ्या स्मार्टफोनविषयी माहिती देण्यात आली आहे. यानुसार 21 सप्टेंबर रोजी मोटोरोला आपला नवीन स्मार्टफोन घेऊन येत आहे. त्याचबरोबर मायक्रोमॅक्स 22 सप्टेंबरला स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Infinix 23 सप्टेंबरला, तर Oppo आणि Realme Narzo 50 सिरीज 24 सप्टेंबरला बाजारात येतील, त्याचबरोबर विवोचा नवीन स्मार्टफोन 25 सप्टेंबरला भारतात येत आहे.

या फोन्सवर मिळू शकतात सवलती-

Poco X3 Pro- Poco ने X3 Pro ला या वर्षाच्या सुरुवातीला 18,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च केले होते, परंतु फ्लिपकार्टने खुलासा केला आहे की तो फोन 16,999 रुपयांना विकेल. हे लॉन्च किमतीपेक्षा 2,000 रुपये कमी आहे.

फ्लिपकार्टच्या टीझर पेजवरून समोर आले आहे की फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान मोटो एज फ्यूजन 20 हा फोन 19,999 रुपयांना उपलब्ध होईल. मोटो एज फ्यूजन 20 च्या बेस व्हेरिएंटची लॉन्च किंमत 21,499 रुपये आहे. फ्लिपकार्ट सेलदरम्यान 1,500 रुपये सवलत मिळत आहे.

सेलमध्ये, तुम्ही Asus ROG Phone 3 हा 34,999 रुपयांना खरेदी करू शकाल. ROG Phone 3 च्या बेस व्हेरिएंटची लॉन्च किंमत 49,999 रुपये होती, पण भारतात ROG Phone 5 लाँच झाल्यानंतर कंपनीने जुन्या फोनची किंमत कमी केली. (हेही वाचा: Realme C25Y च्या प्री-बुकिंगला आजपासून सुरुवात; खरेदीपूर्वी जाणून घ्या खासियत आणि किंमत)

पिक्सेल 4 ए बाबत अद्याप सवलत जाहीर करणे बाकी आहे. मात्र, फ्लिपकार्ट सेलदरम्यान, Pixel 4a ची किंमत 20,000 ते 29,999 रुपयांच्या दरम्यान असेल, जी सध्याच्या 31,999 रुपयांच्या किंमतीपेक्षा कमी आहे. पिक्सेल 4 ए आधी 29,999 रुपयांना उपलब्ध होता, त्यामुळे यावेळी किंमत त्यापेक्षा किंचित कमी असू शकते.