Airtel चा धमाका: १८१ ₹ मध्ये मिळवा प्रतिदिन ३ जीबी डेटासोबत अनलिमिटेड कॉल
Airtel (संग्रहित आणि संपादित प्रतिमा)

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी Airtelने पुरेपूर कंबर कसली आहे. त्यामुळेच Airtelने आपल्या ग्राहकांसाठी एक नावा रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे. मात्र, हा प्लॅन Airtelच्या निवडक ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकाला मिळणार आहे केवळ २८१ रुपयांमध्ये प्रतिदिन ३ जीबी डेटा. तसेच, अनलिमिटेड कॉल सुविधा. महत्त्वाचे असे की, ग्राहकांच्या गरजेनुसार या प्लानमध्ये ३जीबी २जी, ३जी आणि ४जी डेटा उपलब्ध असणार आहे.

टेलिकॉम टॉकच्या रिपोर्टनुसार, Airtelच्या १८१रुपयांवाल्या प्लॅनमध्ये प्रतिदिन ३ जीबी डेटा तसेच, अनलिमिटेड व्हॉईस कॉल (लोकल, एसटीडी आणि रोमिंग),प्रतिदिन १०० एसएमए ग्राहकांना मिळतील. मात्र, या पॅकचा कालावधी केवळ १४ दिवसांसाठी असणार आहे. म्हणजेच ग्राहकाला १४ दिवसांत मिळून एकूण ४२ जीबी डेटा मिळेल. एक  १जीबी डेटाची किंमत काढली तर, ग्राहकाला केवळ ४.३ रुपये दराने डेटा मिळत आहे. दरम्यान, व्हॉईस कॉलला मात्र या प्लॅनमध्ये डेली किंवा विकली असे कोणतेच लिमिट नाही. पण, लक्षवेधी असे की, हा प्लॅन केवळ निवडक एअरटेल ग्राहकांसाठीच (Subscribers to select circles)आहे.

महत्त्वाचे असे की, बाजारात सद्यस्थितीला प्रतिदिन ३जीबी डेटा देणारा Airtelवगळता इतर कोणत्यीह कंपनीचा रिचार्ज प्लॅन उपलब्द नाही. दरम्यान, १९८ रुपयांच्या रिचार्जवर काही जीबी डेटा देणाऱ्या बाजारातील प्रचलित कंपनीच्या डेटा पॅकला Airtelचा हा प्लॅन टक्कर देऊ शकतो.