Airtel डिजिटल टीव्ही HD सेटअप बॉक्सच्या किंमतीत घट, ग्राहकांना दिलासा
TV Cable Charges (Photo Credits: Twitter)

गेल्या काही महिन्यांपासून DTH सेवा खरेदी करण्यासाठी त्याचे दर कमी करण्यात आले आहेत. तर टाटा स्काय, एअरटेल डिजिटल टीव्ही, डी2एच आणि डिश टीव्ही या सर्व कंपन्यांनी त्यांच्या सेटअप बॉक्सची किंमतीत घट केली आहे. तसेच एअरटेल डिजिटल टीव्हीनेसुद्धा आता एचडी युजर्सच्या सेटअप बॉक्सचा किंमतीत घट केली आहे.

एअरटेल डिजिटल टीव्ही सेटअप बॉक्स खरेदी करण्यासाठी ग्राहकांना आतापर्यंत 1,953 रुपये मोजावे लागत होते. परंतु त्याच्या किंमती आता कमी करण्यात आल्या असून ग्राहकांना सेटअप बॉक्ससाठी फक्त 1,453 रुपये द्यावे लागणार आहेत. त्याचसोबत युजर्सला हजार रुपयांचे बेनिफिट देण्यात येणार असून सेटअप बॉक्स 769 रुपयात खरेदी करता येणार आहे. त्यामध्ये 150 चॅनल्स सुद्धा ग्राहकांना देण्यात येणार आहे. (Google Play Store वर 150 पेक्षा अधिक बनावट Jio App, आतापर्यंत हजारो युजर्सने केलेत डाऊनलोड)

तसेच एचडी सेटअप बॉक्समध्ये ग्राहकांना खास फिचर्स देण्यात येतात. मुख्यत्वे या बॉक्समध्ये पिक्चर क्वालीटी उत्तम असते.डॉल्बी डिजिटल प्लस याचा सुद्धा सपोर्ट सेटअपबॉक्ससाठी देण्यात आला आहे. एअरटेल त्यांच्या ग्राहकांना त्यांच्या आवडीचे शो रेकॉर्ड करु शकतात. तर टेलिकॉमच्या एका रिपोर्टनुसार ज्या ग्राहकांकडे एसडी सेटअप बॉक्स आहे त्यांना जर तो एचडीमध्ये अपडेट करायचा असल्यास त्यांना 699 रुपये मोजावे लागणारा आहेत.