Reliance Jio (Photo Credits: Twitter/ Reliance Jio)

गुगल प्ले स्टोअरवर (Google Play Store) आतापर्यंत काही बनावट अॅप जास्त प्रमाणात आढळून आल्याच्या तक्रार समोर आल्या आहेत. तर ताज्या घटनेनुसार आता प्ले स्टोअरवर रिलायन्स कंपनीच्या जिओ (Jio) बाबतचे जवळजवळ 150 बनावट अॅप लॉन्च करण्यात आले आहेत. अशा पद्धतीचे अॅप जाहिराती दाखवून डेव्हलपर्संना पैसे कमावून देण्यासाठी मदत करत आहेत. त्याचसोबत युजर्सने हे अॅप डाऊनलोड करावेत म्हणून त्यांना फ्री-डेटा मिळणार असल्याची भुरळ पाडली जात आहे.

Symantec ने जाहीर केलेल्या एका रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले आहे की, प्ले स्टोअरवर 152 बनावट अॅप उपलब्ध आहेत. या अॅपचा लूक खऱ्या जिओच्या अॅपसह एकदी तंतोतंत मिळता जुळता आहे. असे अॅप युजर्सला फुकटात डेटा देत आहोत अशी भुल घालातात. त्याचसोबत युजर्सने हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यांना एका बेवपेजवरुन एकापाठून एक अशा विंडोज सुरु होतात. त्याचसोबत हे बनावट अॅपसाठी विविध नावे देण्यात आली असून त्यासाठी पॅकेजेस ठेवण्यात आले आहेत. त्यामध्ये युजर्सला 25GB ते 125 GB देण्यात येत असल्याचे सांगितले जाते. यामुळे युजर्स एवढ्या मोठ्या इंटरनेट पॅकच्या हव्यासापायी हे बनावट अॅप डाऊनलोड करत आहेत.(WhatsApp मध्ये येणार नवे फिचर, फोटो किंवा व्हिडिओ चॅट करतानाच करु शकणार एडिट)

तसेच आतापर्यंत अशा बनावट अॅप डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या 40 हजाराच्या घरात जाऊन पोहचली आहे. हे अॅप जानेवारी ते जून या सहा महिन्यांच्या कालावधीत डाऊनलोड करण्यात आले आहेत. अद्याप हे बनावट अॅप युजर्सचा डेटा चोर करत नाही मात्र स्मार्टफोन या अॅपमुळे धिम्या गतीने काम करतो.