WhatsApp मध्ये येणार नवे फिचर, फोटो किंवा व्हिडिओ चॅट करतानाच करु शकणार एडिट
फोटो सौजन्य- Digital Trends

व्हॉट्सअॅपवर (WhatsApp) लवकरच नवीन एक फीचर येणार असून त्यामध्ये युजर्सला फोटो किंवा व्हिडिओ चॅट करताना एडिट करु शकणार आहे. Quick Edit Media Shortcut असे या नव्या फिचरचे नाव असणार आहे. या फिचरमुळे काही सेंकदात तुम्हाला फोटो किंवा व्हिडिओ एडिट करु शकता.

या फिचरमध्ये युजर्सला फोटो किंवा व्हिडिओ चॅट करताना एडिट करत असल्यास तेथे टेक्स्ट आणि डूडला उपयोग करता येणार आहे. त्याचसोबत फोन स्टोरेजसुद्धा वाचणार असून प्रत्येक वेळी एडिट करताना मीडिया फाईल सेव्ह करावी लागणार नाही आहे. मात्र ओरिजनल मीडिया फाईल सेव्ह होणार आहे.(WhatsApp वरील खास मेजेस 'या' सोप्या ट्रिकने करा सेव्ह)

क्विक ए़डिट मीडिया शॉर्टकर्ट हे फिचर अँन्ड्रॉई़ड आणि आयओस युजर्सला वापरता येणार आहे. तसेच मात्र कंपनी हे फिचर कधी लॉन्च करणार आहे याबद्दल अधिक खुलासा करण्यात आलेला नाही. हे फिचर फक्त सध्या टेलीग्राम मेसेजिंग अॅपसाठी सुरु करण्यात आले आहे.