Instagram (Photo Credits-Twitter)

कोरोना व्हायरसने सर्वत्र थैमान घातल्याने लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. तसेच लॉकडाउनच्या काळात नागरिकांना सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करणे अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले आहे. लॉकडाउनमुळे एकमेकांना भेटता येत नसल्याने व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून संवाद साधता येत आहे. व्हिडिओ कॉलिंगच्या मदतीने घरी बसलेल्या नागरिकांना त्याच्या फार उपयोग होत आहे. याच दरम्यान, फेसबुक नंतर आता इन्स्टाग्रामवर मेसेंजर रुम्स (Messenger Rooms) फिचर माध्यमातून आता एकाचवेळी 50 जणांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलता येणार आहे.

इन्स्टाग्रामच्या ट्वीटर अकाउंटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, युजर्सला आता Facebook Messenger Rooms क्रिएट करुन 50 जणांसोबत व्हिडिओ कॉलवर बोलता येणार आहे. यामध्ये या फिचरचा कसा उपयोग करायचा ते सुद्धा सांगण्यात आले आहे. तसेच इंन्स्टाग्रामच्या युजर्ससाठी हे फिचर फायदेशीर ठरेल अशी अपेक्षा केली जात आहे. व्हिडिओच्या माध्यमातून असे सांगण्यात आले आहे की. इंन्स्टाग्राम आणि फेसबुक मेसेंजर रुम्स क्रिएट करण्यासाठी New Video Chat येथे Facebook Messenger Rooms चे ऑप्शन मिळणार आहे. तेथे युजर्सला Invite पाठवून व्हिडिओच्या माध्यमातून एकमेकांशी जोडले जाऊ शकता. तसेच युजर्सला मेजेंर रुम्स लॉक करण्याचा सुद्धा ऑप्शन देण्यात आला आहे. (Facebook कंपनीचे 50 टक्के कर्मचारी पुढील 5-10 वर्षापर्यंत करणार Work From Home)

गेल्या काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या एका रिपोर्टनुसार व्हॉट्सअॅपच्या Android Beta 2.20.163 मध्ये Messenger Rooms चे शॉटकर्ड देण्यात आले आहे. कंपनीने सध्या ते काही युजर्सला टेस्टिंगसाठी उपलब्ध करुन दिले आहे. लवकरच ते सर्व युजर्ससाठी रोलआउट केले जाण्याची शक्यता आहे.