फेसबुक (Facebook) कंपनीचे सीईओ (CEO) मार्क ज़ुकेरबर्ग (Mark Zuckerberg) यांनी असे म्हटले आहे की, पुढील 5-10 वर्षांसाठी कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करण्याची सुविधा उपलब्ध करुन देणार आहे. जगातील सर्वाधिक मोठी सोशल मीडिया कंपनीने कोरोना व्हायरसच्या कारणास्तव वर्क फ्रॉम होम पॉलिसीला सपोर्ट केला आहे. फेसबुकच्या मते त्यांचे हे पाऊल फक्त कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी घेण्यात आले आहे. फेसबुकने त्यांच्या एका विधानात असे स्पष्ट केले आहे की, सध्याच्या कर्मचाऱ्यांमधील काही जणांसाठी रिमोट वर्किंगसाठी सपोर्ट केला जाणार आहे.
कंपनी असे आवाहन केले आहे की ऑफिस सुरु झाल्यानंतर सुरुवातीला फक्त 25 टक्के कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात येणार आहे. ही पॉलिसी जानेवारी सुरु होणार आहे. त्याचसोबत कर्मचाऱ्यांना त्यांचा पगार त्यांनी दिलेल्या बँकेच्या ठिकाणी जमा होणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.(Facebook कडून भारतीय युजर्ससाठी Profile Lock फिचर रोलआउट)
फेसबुक आधी ट्वीटरने दोन आठवड्यांपूर्वी त्यांच्या काही कर्मचाऱ्यांना कायमचे घरुन काम करण्यासाठी वर्क फ्रॉम होम पॉलिसी लागू करण्यात आली आहे. जुकेरबर्ग यांनी फेसबुक पेजवर लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून असे म्हटले आहे की, काही वेघळा आपण लहान शहर, विविध समुदाय आणि जमातींच्या लोकांना नोकरी देण्यापासून दूर राहतो. मात्र रिमोटवर काम करताना अशा लोकांना नोकरी देणे शक्य होऊ शकते. जुकेरबर्ग यांनी कंपनी रिमोट हायरिंगमध्ये वेग आणू शकते असे ही म्हटले आहे. कंपनी येत्या काही काळात अॅडवान्स इंजिनिअरिंगसाठी नोकर भरती करण्याची शक्यता आहे.