आजकाल फोटोज, सेल्फीची जशी क्रेझ आहे तसे फोटोज एडिट करण्याचेही फॅड आहे. त्यामुळे एडिटींग सॉफ्टवेअर्स आणि अॅप्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. मात्र या सुविधेमुळे अनेकदा खरा फोटो ओळखणे कठीण होते. यासाठी Adobe ने एक खास टूल तयार केले आहे. याद्वारे एडिट किंवा फोटोशॉप केलेला फोटो ओळखणे शक्य होणार आहे. Artificial Intelligence (AI) असे या टूलचे नाव असून यामुळे चेहऱ्यात एडिटिंगमुळे केलेले बदल ओळखता येणार आहेत.
युनिर्व्हसिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कलेतील संशोधकांच्या सहकार्याने अॅडोबीने हे नवे टूल तयार केले आहे. या नव्या टूलमुळे फेक, एडिटेड फोटो ओळखण्याची अडचण दूर होणार आहे. तसंच फोटो, व्हिडिओ, ऑडिओ यात करण्यात आलेले एडिटिंग देखील या टूलद्वारे ओळखता येणार आहे. (PDF तुम्हाला Edit करायची असल्यास 'हे' App किंवा सॉफ्टवेअर करतील तुमची मदत)
'फेस अवे लिक्विफाय' या फिचरच्या मदतीने फोटोमध्ये करण्यात आलेले बदल पाहणे शक्य होणार आहे. चेहऱ्याचा आकार, ओठ, डोळे व्यवस्थित करण्यासाठी या फिचरचा वापर करण्यात येतो. या टूलच्या मदतीने चेहऱ्यात करण्यात आलेले बदल ओळखता येतील.