PDF तुम्हाला Edit करायची असल्यास 'हे' App किंवा सॉफ्टवेअर करतील तुमची मदत
PDF तुम्हाला Edit करायची असल्यास 'हे' अॅप किंवा सॉफ्टवेअर करतील तुमची मदत (Photo Credits -Facebook)

PDF असे एक फॉर्मेट आहे ज्यामध्ये कोणतीही माहिती अगदी सोप्या पद्धतीने एकाच जागी साठवून ठेवता येते. परंतु पीडीएफ मधील कोणतीही माहिती तुम्हाला दुरुस्ती करायची असेल तेव्हा काही अडथळा येतो. त्याचसोबत पीडीएफ मध्ये दुरुस्ती करता येईल यापद्धतीने बनवले गेले नाही. त्यासाठी तुम्हाला एका विशिष्ट सॉफ्टवेअर किंवा अॅपची मदत घ्यावी लागते. त्यामुळे आम्ही तुम्हाला पीडीएफ मधील माहितीत बदल करावयाचा असल्यात तो कशा पद्धतीने तुम्ही शकता हे सांगणार आहोत.

Adobe Acrobat:

पीडीएफ फॉर्मेटला Adobe ने बनवले आहे. तसेच पीडीएफ एडिट करण्यासाठी Adobe Acrobat या अॅपची गरज भासते. यासाठी युजर्सना Adobe Document Cloud (DC) सोबत Access करणे आवश्यक ठरणार आहे. यासाठी फ्री ट्रायल देण्यात येत असून तात्पूरते लॉगिन ही या अॅपकडून देण्यात येते.

PDF Xchange:

PDF Xchange ला तुम्ही फ्री डाऊनलोड करु शकता. तसेच युजर्स याचा वापर करुन पीडीएफ मध्ये काही बदल करु शकतो. युजर्स याच्यामाध्यमातून Split pages, Spell Check, Translate, Add Comment आणि External Links यामध्ये अॅड करु शकता.

Sejda online PDF editor:

जर तुम्हाला कोणतेही अॅप किंवा सॉफ्टवेअर डाऊनलोड करायचे नसल्यास ऑनलाईन एडिटर Sejda उत्तम पर्याय आहे. हे ऑनलाईन सॉफ्टवेअर टेक्स्ट,डिजिटल चिन्हे, व्हॉईस आऊटिंग आणि इमेज एडिट करण्याची सोय करुन देते, तसेच या सॉफ्टेवर साठी कोणत्याही प्रकारचे बंधन घालण्यात आलेले नाही. यामध्ये जास्तीत जास्त 200 पाने एडिट करण्याची क्षमता असते.

तर तुम्हाली पीडीएफ मधील माहितीत कोणताही बदल करायचा असेल तर वरील दिलेल्या सॉफ्टेवेअरच्या आधारे तुम्ही समस्या सोडवू शकता.