Aarogya Setu App वर दिसणार आता COVID-19 Vaccine Status; नवं Blue Tick फीचर देणार माहिती
Aarogya Setu app | (Photo Credits: Twitter)

भारत सरकारच्या वन स्टॉप कोविड 19 स्मार्टफोन अ‍ॅप आरोग्यसेतू (Aarogya Setu App) ला आता अपडेट करण्यात आलं आहे. यामध्ये आता ब्ल्यू टिक फीचर (Blue Tick Feature) देण्यात आलं आहे. यामुळे आता आरोग्यसेतू अ‍ॅप ज्यांनी कोविड 19 ची लस घेतली आहे त्यांचं स्टेटस (COVID 19 Vaccine Status) दाखवू शकणार आहे. दरम्यान कालच याबाबतची माहिती आरोग्यसेतू अ‍ॅपने ट्वीटर देत भारतातील नागरिकांना लवकरात लवकर कोविड 19 ची लस घेण्याचं आवाहन केले आहे.

आता आरोग्यसेतू अ‍ॅप वर लस घेतल्यानंतर तुमच्या नावापुढे ब्ल्यू टिक दिसणार आहे. एक टिक म्हणजे पहिला डोस आणि डबल टिक म्हणजे दोन्ही डोस घेतल्याचं आता आरोग्यसेतू अ‍ॅपवर दाखवले जाणार आहे. दरम्यान तुम्ही आरोग्यसेतू अ‍ॅप वरून देखील लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करू शकणार आहात. एका मोबाईल नंबर वरून चार जणांचे रजिस्ट्रेशन करण्याची मुभा आहे. (नक्की वाचा: COVID-19 Vaccine Certificate: कोविड 19 लसीचा डोस घेतल्यानंतर Aarogya Setu, CoWIN वरून वॅक्सिन सर्टिफिकेट्स डाऊनलोड कशी कराल?).

दरम्यान सुरूवातीला आरोग्यसेतू अ‍ॅप हे देशात कॉन्टॅक्ट ट्रेसिंग साठी वपारले जात होते. या अ‍ॅपच्या माध्यमातून युजर्स हाय रिस्क झोनमध्ये तर नाही ना? त्याच्या संपर्कात आलेल्यांना कोविड ची लागण झाल्यास त्याचे अपडेट्स आरोग्यसेतू अ‍ॅपवर दिले जात असे. नंतर काळानुरूप काही बदल करण्यात आले. कोवीड 19 विषयक सारीच माहिती आता आरोग्यसेतूवर दिली जात आहे. आता तर कोविड 19 लसीसाठी देखील हे अ‍ॅप वापरण्यात येते.

अद्याप आरोग्यसेतू अ‍ॅप वर अनेक कमतरता देखील आहेत. त्यापैकीच एक म्हणजे लसीकराणाच्या स्लॉट्सच्या अव्हेलिबिटीची माहिती. ही अजूनही अ‍ॅपवर दाखवली जात नाही. देशात सध्या 18 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू झाले आहे. त्यामुळे लस घेण्याकडे मोठ्या वर्गाचा ओढा आहे. पण लसीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी लसीकरणाचा कार्यक्रम रेंगाळत आहे.