कोबे ब्रायंट आणि मुलगी गिगी व चेतन चौहान (Photo Credit: Facebook)

Sports Deaths in 2020: 2020 हे फक्त जगभरात विनाश घडवून आणणार्‍या प्राणघातक कोरोना व्हायरससाठी (Coronavirus) ओळखले जाणार नाही तर अगदी पहिल्यापासूनच ते अखेरच्या महिन्यापर्यंत क्रीडा क्षेत्रातील प्रसिद्ध खेळाडूंच्या निधन झाल्यामुळे हे क्रीडा जगातील सर्वात दुःखद वर्ष म्हणून ओळखले जाईल. 2020 मध्ये कोबे ब्रायंट (Kobe Bryant) आणि डिएगो मॅराडोना (Diego Maradona) यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील काही प्रमुख खेळाडूंनी जीवनाच्या मैदानातून एक्सिट घेतली. त्यांच्या अकाली निधनाच्या बातमीने त्यांच्या चाहत्यांसह अनेकांना धक्का बसला आणि सर्वच क्षेत्रांतून शोक व्यक्त करण्यात आला. सामाजिक अशांतता आणि आर्थिक संकटाने चिन्हांकित केलेले हे वर्ष आता आपला निरोप घेण्यासाठी तयार असताना 2020 मध्ये जीवनीच्या मैदनातून आऊट झालेल्या महान क्रीडा व्यक्तिमत्त्वांची आठवण करणार आहोत. (Year-Ender 2020: एमएस धोनी ते मोहम्मद आमिर; 'या' अव्वल क्रिकेटपटूंनी यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम)

कोबे ब्रायंट

अमेरिकन बास्केटबॉल लेजेंड कोबे ब्रायंट आणि त्याची 13 वर्षांची मुलगी यांचा 26 जानेवारी 2020 रोजी कॅलाबास येथे हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाले. हेलिकॉप्टर ब्लॅक बॉक्सने सुसज्ज नसल्याने अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. ब्रायंट, पाच वेळा एनबीए चॅम्पियन आहे आणि दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता असून इतिहासातील सर्वश्रेष्ठ बास्केटबॉलपटूंपैकी एक आहे.

डिएगो मॅराडोना

मॅरेडोना यांचे 25 नोव्हेंबर 2020 रोजी वयाच्या 60 व्या वर्षी त्याच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मृत्यूच्या काही दिवसआधी त्यांच्या मेंदूत शस्त्रक्रिया करण्यात आली असून घरीच डॉक्टरांकडून उपचार सुरू होते. मॅरेडोना बॉलवर नियंत्रण ठेवण्याच्या आणि आपल्या संघासाठी स्कोअरिंगच्या संधी निर्माण करण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध होता.

सर एव्हरटन वीक्स

वेस्ट इंडीज फलंदाज सर एव्हर्टन वीक्स यांचे वयाच्या 95 व्या वर्षी 1 जुलै रोजी निधन झाले. 2019 मध्ये हृदयविकाराच्या हटक्यानंतर वीक्स आजारी होते. 1948 मध्ये इंग्लंड आणि भारतविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक शतक ठोकण्याचा विक्रम वीकस यांच्या नावावर आहे. 1995 मध्ये त्यांना नाईटहूड देण्यात आले तर 2009 मध्ये त्यांना आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले होते.

चेतन चौहान

माजी भारतीय क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे 16 ऑगस्ट रोजी रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 73 वर्षांचे होते. चौहान यांना गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि मृत्यूच्या काही दिवस आधी मूत्रपिंड व रक्तदाब समस्या उद्भवल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चौहान यांना जुलै महिन्यात कोरोनाची सकारात्मक लागण झाली ज्यामुळे त्याची प्रकृती अधिकच खालावली. हुशार खेळाडू म्हणून ओळखले जाणारे चौहान यांनी 1969 ते 1978 दरम्यान 40 कसोटी सामन्यात31.57 च्या सरासरीने 2084 धावा केल्या. चौहान यांनी महाराष्ट्र आणि दिल्लीकडून रणजी खेळली आणि 1981 मध्ये अर्जुन पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

डीन जोन्स

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे 24 सप्टेंबर रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. आयपीएल दरम्यान मुंबईत असताना 24 सप्टेंबर रोजी रात्री 12 नंतर मुंबईच्या एका हॉटेलमध्ये जोन्स यांना हृदयविकाराचा झटका आला होता. जोन्स यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ऑस्ट्रेलियाकडून 52 कसोटी आणि 164 एकदिवसीय सामने खेळले. "प्रोफेसर डिनो" म्हणून प्रसिद्ध असलेल्या व्हिक्टोरियन फलंदाज आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात आक्रमण करणार्‍या फलंदाजीच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते.

चुनी गोस्वामी

मधुमेह, प्रोस्टेट इन्फेक्शन आणि न्यूरोलॉजिकल समस्यांसह मूलभूत आजारांशी झुंज दिल्यानंतर 30 एप्रिल, 2020 रोजी कोलकातामध्ये वयाच्या 82व्या वर्षी गोस्वामी यांचे निधन झाले. 1960 उन्हाळी ऑलिंपिकमध्ये गोस्वामीने भारतीय राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधीत्व केले आणि 1962 आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविण्यास संघाचे नेतृत्व केले.

'हिंदकेसरी' श्रीपती खंचनाळे

पहिले 'हिंदकेसरी' श्रीपती खंचनाळे यांनी वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर कोल्हापुरातील खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. ते आयुष्यभर कुस्तीत येणाऱ्या अनेक पिढ्यांना मार्गदर्शन करत राहीले. अनेक हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी यांच्यासह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीत नाव कमावलेल्या पैलवानांचे ते वस्ताद ठरले.