एमएस धोनी (Photo Credits: Twitter)

आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये भारताच्या सेमीफायनलमधील पराभवामुळे सर्वांना चांगलीच निराशा झाली आहे. विशषज्ञ आणि चाहत्यांकडून खेळाडूंबद्दल मोठी टीका केली जात आहे. आणि यात पहिले नाव येते ते माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याचे. मागील महिन्यात इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या क्रिकेट विश्वचषकमध्ये धोनीच्या संथ खेळींबबाद चहू बाजूने टीका केली जात होती. त्याने आता खेळातून निवृत्त व्हावे असे देखील सांगण्यात आले. (एमएस धोनी याच्या मिशन काश्मीरला सुरुवात, Army कॅम्पमधील पाहिल्यादिवसाचा फोटो सोशल मीडियावर Viral)

दरम्यान, न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनल सामन्यात 10 धावांच्या आत भारताचे 3 गडी बाद झाल्यानंतर धोनी, सर्वात अनुभवी खेळाडूला फलंदाजीला पाठवण्याऐवजी अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि रिषभ पंत या युवा खेळाडूंना पाठवण्यात आले. आणि धोनीला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवण्यात आले. यावर सर्वत्र चर्चा सुरु झाल्या. विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्या निर्णयावर टीका केल्या जाऊ लागल्या. पण आता टीम इंडियाचे बॅटिंग कोच संजय बांगर (Sanjay Banger) यांनी याबाबात आपले मौन सोडले आणि मत मांडले. हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत बांगर यांनी सांगितले की, "मी खरोखरच चापल्या सारखे वाटत आहे की लोकं मला या दृष्टिकोनातून माझ्याकडे पहात आहेत कारण टीममध्ये निर्णय घेण्याचा एकमात्र अधिकार माझ्याकडे नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, आम्ही बर्‍याच परिस्थितींचे आकलन करतो आणि त्यातून जातो."

"आम्ही हे नक्की केले होते की आम्ही 5, 6 आणि 7 व्या क्रमांकाबद्दल लवचिकता बाळगण्याचा निर्णय घेतला होता कारण आम्ही 30-40 ओव्हरचा जास्तीत जास्त विचार करीत होतो. आणि, प्रत्येक व्यक्तींना त्याबद्दल चांगल्या प्रकारे माहिती होती. सेमीफायनल गाठल्यानंतर विराटने आपल्या पत्रकार परिषदेत असेही सांगितले की, अफगाणिस्तान खेळानंतर धोनी थंड्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. ज्याने तो 35 व्या ओव्हरनंतर खेळू शकेल आणि आपल्या अनुभवासह खालच्या ऑर्डरचीही काळजी घेईल. आणि म्हणून सेमीफायनलमध्ये तो सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता." दिनेश कार्तिक याला अजून विकेट्स बाद होण्यापासून रोखण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये सल्लामसलत झाल्यानंतर पाचव्या क्रमांकावर पाठवण्यात आल्याचे देखील बांगर यांनी स्पष्ट केले.