सानिया मिर्झा (Photo Credit: Getty)

भारताचे माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (Mahendra Singh Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्यानंतर सर्वसामन्यांपासून तर अनेक राजकीय नेते, खेळाडू, बॉलिवूड कलाकारांसह बऱ्याच लोकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. भारताची टेनिसपटू सानिया मिर्झाने (Sania Mirza) सुद्धा धोनीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सानिया मिर्झाने एका मुलाखातीत धोनीच्या निवृत्तीबाबत भाष्य करून सर्वांचे लक्ष्य केंद्रीत करून घेतले आहे. महेंद्रसिंह धोनीला पाहिले तर, माझ्या नवऱ्याची म्हणजेच शोएब मलिकची आठवण येते, असे वक्तव्य तिने केले आहे. तसेच महेंद्रसिंह धोनी हा इतर खेळाडूंपेक्षा वेगळा का ठरला? याबाबत स्वत:चे मतही व्यक्त केले आहे.

"धोनीने जर ठरवले असते तर तो आपला निवृत्तीचा सामना खेळला असता. पण धोनीने शांतपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. हीच धोनीची गोष्ट सर्वात वेगळी आहे. या गोष्टीमुळेच धोनी हा बाकीच्या खेळाडूंपेक्षा वेगळा ठरतो. अशा काही गोष्टीच धोनीला कॅप्टन कूल बनवतात, असे सानिया मिर्झाने म्हटले आहे. याशिवाय, धोनीने स्वत:साठी नाही तर देशासाठी बरेच काही केले आहे. देशाला बऱ्याच गोष्टी धोनीने मिळवून दिल्या आहेत. त्यामुळे धोनीची जागा कोणीही घेऊ शकणार नाही", असे सानिया मिर्झाने म्हटले आहे. तसेच, धोनी आणि शोएबमध्ये बरेच गुण सारखे आहेत. त्यांच्यामध्ये बरीच समानता आहे. मैदानातही धोनी आणि शोएब नेहमीच शांत राहिला आहे. त्यामुळे धोनी हा काही गोष्टींमध्ये शोएबसारखाच आहे", असे सानिया मिर्झा म्हणाली आहे. हे देखील वाचा- Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 10,441 नवे कोरोना संक्रमित रुग्ण, तर 258 जणांचा मृत्यू; राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6,82,383 वर पोहचली

धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने अचानक घेतलेल्या निर्णायाने क्रिकेट विश्वात एकच खळबळ उडाली होती. संपूर्ण देश स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना संध्याकाळी धोनीने आपल्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट करत, आपण निवृत्त होत असल्याचे जाहीर केले.