Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 10,441 नवे कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 258 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 6 लाख 82 हजार 383 वर पोहोचली आहे. आतापर्यंत राज्यात 4 लाख 88 हजार 271 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या राज्यात 1 लाख 71 हजार 542 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.
आज राज्यात 8157 जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 71.55 टक्के इतके आहे. तर कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 3.26 टक्के इतके आहे. (हेही वाचा - Coronavirus: 'गाफील राहू नका', मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नागरिकांना इशारा; कोरोना व्हायरस लसीवरही केले भाष्य)
10,441 new #COVID19 cases and 258 deaths reported in Maharashtra today. The total number of positive cases now stands at 6,82,383 including 4,88,271 recoveries and 1,71,542 active cases: State Health department pic.twitter.com/0SexmDxE49
— ANI (@ANI) August 23, 2020
दरम्यान, आज मुंबईमध्ये 991 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तसेच 34 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 1 लाख 36 हजार 348 इतकी झाली आहे. सध्या मुंबई शहरात 18,565 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत 1 लाख 10 हजार 69 रुग्णांची कोरोना विरुद्धची झुंज यशस्वी ठरली आहे. तसेच 7 हजार 419 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.