'सर्वोकृष्ट गोलंदाज कोण?' शोएब अख्तर यांनी विराट कोहली याचे नाव घेताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
शोएब अख्तर (Photo Credit: Video Screen Grab)

पाकिस्तान संघाचे माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) यांनी सुरु केलेले ट्युटूब चॅनल नेहमी चर्चेचा विषय ठरला आहे. शोएब अख्तर हे युट्यूब चॅनलच्या माध्यमातून क्रिकेटच्या संदर्भात चर्चा करत असतात. शोएब अख्तर हे युट्यूबच्या माध्यमातून खेळाडूंना योग्य मार्गदर्शन करत असतात. तसेच चाहत्यांना अनोखा प्रश्न विचारून त्यांना आपले मत मांडण्याची संधी देत असतात. दरम्यान, ट्विटरच्या माध्यमातून नेटकऱ्यांनी शोएब अख्तर यांना एक प्रश्न विचारला होता की, सर्वोकृष्ट गोलंदाज कोण आहे? यावर शोएब अख्तरने विराट कोहलीचे नाव घेतले. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांची खिल्ली उडवायला सुरुवात केली.

शोएब अख्तर हे युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून खेळाडूंना सल्ला देत असतात. नुकतेच शोएब अख्तर यांनी ट्विटरच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांसोबत 15 मिनिट चर्चा केली. दरम्यान, शोएब अख्तर यांनी त्यांच्या आवडत्या खेळाडू आणि सध्या जोरदार चर्चेत असलेल्या खेळाडूंच्या संदर्भात माहिती दिली. त्यावेळी त्यांच्या एका चाहत्याने जगात सर्वोकृष्ट गोलंदाज कोण आहे? असा प्रश्न विचारला होता. यावर शोएब अख्तर यांनी दिलेल्या उत्तर अधिक चर्चेचा विषय ठरला. त्यावेळी त्यांनी विराट कोहलीचे नाव घेताच चाहत्यांनी त्यांची खिल्ली उडवली. या प्रश्नावर शोएब अख्तर यांनी मोहम्मद शामीचे नाव घेतील अशी अपेक्षा होती, असेही चाहते म्हणाले आहेत. शोएब अख्तर यांनी हे ट्वीट रद्द केले आहे, अशी माहिती लोकमत वृ्ताने दिली आहे. हे देखील वाचा- Ind vs Ban: कसोटी सामन्यात मोठा विजय मिळवल्यानंतर कर्णधार विराट कोहलीने घेतली खास चाहत्याची भेट (Video)

दरम्यान, एका चाहत्यांने कोणत्या खेळाडूला बाद करणे कठीण आहे, असा प्रश्न केला होता. त्यावेळीही त्यांनी विराट कोहलीचे नाव घेतले होते. शोएब अख्तर यांनी दिलेले उत्तराला चाहत्यांनी पसंती दर्शवली आहे.