भारतीय क्रिकेट संघाच्या यशात धोनीचे मोठे योगदान, माजी खेळाडू सय्यद किरमाणीकडून समर्थन
Mahendra Singh Dhoni. (Photo Credits: Indian Cricket Team/Facebook)

नुकताच पार पडलेल्या क्रिकेट विश्वकप २०१९ (World cup 2019) मध्ये विश्वविजेता म्हणून इंग्लंडच्या (England) संघाने मान पटकावला आहे. दरम्यान, विश्वकप स्पर्धेनंतर महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) निवृती घेईल, अशा चर्चांना उधाण आले होते. परंतु धोनीने निवृत्ती घेतली नाही. यामुळे अनेक लोकांनी धोनीच्या या निर्णयावर प्रश्न निर्माण केले होते. परंतु भारताचे माजी क्रिकेट खेळाडू सय्यद किरमाणी (Syed Kirmani) यांनी धोनीचे समर्थन करत, प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या लोकांना टोला लगावला आहे. महेंद्र सिंह धोनी हा तरुणांसाठी रोल मॉडल आहे आणि त्याचे संघात राहणे गरजेचे आहे, असे किरमाणी म्हणाले. धोनीच्या धीम्यागतीच्या खेळीवर टिका केली जात आहे. सध्या संघात धोनीच्या जागेवर युवा फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) या खेळाडूला संधी देण्यात आली आहे.

कोलकाता (Kolkata) येथे पार पडलेल्या एका कार्यक्रमात किरमाणी यांनी महेंद्र सिंह धोनीबदल आपले मत मांडले आहे. दरम्यान किरमाणी म्हणाले की, महेंद्र सिंह धोनी हा युवा खेळाडूंसाठी रोल मॉडल आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृती स्वीकारली आहे. तसेच एकदिवसीय क्रिकेटमधून कधी निवृती घ्यायची आहे, याचा निर्णयही धोनीच करेल. यामध्ये कोणीही मध्यस्ती करु नये, असा सल्लाही किरमाणी यांनी अनेकांना दिला. हे देखील वाचा-आयपीलएल स्पॉट-फिक्सिंग प्रकरणात BCCI शांत; श्रीशांत याच्यावरील आजीवन बंदी हटवून 7 वर्षांवर आणली

महेद्र सिंह धोनीने भारतीय क्रिकेट संघासाठी मोठे योगदान दिले आहे. त्याने एकदिवसीय, कसोटी आणि टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाला चांगले यश मिळवून दिले आहे. सध्या महेंद्र सिंह धोनीला संघात स्थान मिळणे अधिक गरजेचे आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर त्याची जागा घेण्यासाठी भारतीय संघाजवळ उत्तम खेळाडू आहेत. परंतु जो पर्यंत धोनी निवृत्ती स्वीकारत नाही, तो पर्यंत त्याला संघात सामील केले पाहिजे, असेही किरमाणी म्हणाले.