Amravati: धक्कादायक! विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव होताच मोठ्या भावाने लहान भावाची केली हत्या, वडील गंभीर जखमी
Murder (file image)

19 नोव्हेंबर हा दिवस भारतीय क्रिकेट संघ आणि त्यांच्या चाहत्यांसाठी अत्यंत वाईट आणि निराशाजनक दिवस होता. विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टीम इंडियावर 6 गडी राखून विजय मिळवला. भारताच्या या पराभवाने केवळ क्रिकेट संघच नाही तर प्रत्येक चाहत्यांना उद्ध्वस्त झाले होते. या पराभवाचे दु:ख काही लोकांना अजूनही गिळता आलेले नाही. त्यामुळे काहींनी तिथे आत्महत्या केली. दरम्यान, अशीच एक धक्कादायक घटना अमरावतीतून समोर आली आहे. भारताचा पराभव होताच मोठ्या मुलाने वडील आणि लहान भावावर लोखंडी रॉडने हल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अंकित इंगोलेचा मृत्यू झाला, तर त्याच्या वडिलांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

वास्तविक या हृदयद्रावक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बडनेरा पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. रविवारी रात्री तिघेही घरी बसून वर्ल्डकप पाहत होते आणि दारूही पीत होते. पण भारताचा पराभव झाला आणि सामना संपला. क्रिकेट मॅच हरल्यानंतर त्यांच्यात वाद सुरू झाला. नशेत असलेल्या प्रवीणने भाऊ आणि वडिलांना तुम्ही मटण खाल्ले म्हणून भारत हरला असे म्हणत शिवीगाळ करू लागला. (हे देखील वाचा: IND vs AUS T20 Head to Head: भारत की ऑस्ट्रेलिया? टी-20 मध्ये कोणाचा वरचष्मा, जाणून घ्या आकडेवारी)

त्याच्या वडिलांनी त्याचा मोबाईल हिसकावून त्याला मारहाण केली. यामुळे आरोपी संतापला आणि रागाच्या भरात त्याने घरातून लोखंडी रॉड आणून भाऊ अंकितवर हल्ला केला. वडिलांनाही मारहाण केली. अंकित इंगोले (28) असे मृत तरुणाचे नाव असून प्रवीण इंगोले (32) असे आरोपीचे नाव आहे. रमेश इंगोले असे त्याच्या वडिलांचे नाव असून ते गंभीर जखमी झाले आहेत. वडिलांच्या तक्रारीवरून बडनेरा पोलिसांनी आरोपी प्रवीणविरुद्ध भादंवि कलम 302.307 अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.