COVID-19 Outbreak: कोरोना व्हायरसविरुद्ध लढाईत खेळाडूंनी दाखवला सहभाग, जाणून घ्या कोण कशाप्रकारे करत आहे मदत
गौतम गंभीर आणि सौरव गांगुली (Photo Credit: IANS)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) जगातील जवळपास सर्व देशांची स्थिती गंभीर बनली आहे. 25 मार्चपर्यंत मिळालेल्या अहवालानुसार जगभर 20,000 लोकांचा या घातक व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. या व्हायरसविरुद्ध लढाईत अनेक देश एकत्र आले असून अनेक देशांमध्ये आंशिक किंवा पूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. भारतामध्ये कोरोनाने आपले पाय पसरवले आहे. 600 हुन अधिक लोकांना भारतात या व्हायरसची लागण झाली आहे. ज्यांचे दैनंदिन मजुरीवर अवलंबून आहे अशा लोकांचेसर्वात जास्त नुकसान झाले आहे. त्यांचे आयुष्य आणि कमाईवर ब्रेक लागला आहे. अचानक टूर्नामेंट्स पुढे ढकलल्यामुळे क्रीडा क्षेत्राचेही मोठे नुकसान झाले आहे. आणि त्यातील काही रद्द देखील करण्यात आल्या आहेत. याक्षणी सामान्य लोक काहीही करु शकत नाहीत आणि ही स्थिती लवकरच सामान्य होईल अशीच सध्या ते ईश्वर चरणी प्रार्थना करत आहे. (Coronavirus: भारताला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा क्रिकेटपटू आता 'या' अंदाजात देतोय कोरोना व्हायरसविरुद्ध लढा)

या क्षणी, एकमेकांना मदत करण्याची काळाची गरज बनली आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडापटू यांनी पुढाकार घेतला आणि सर्व आपापल्या परीने मदत करत आहे. कोणी पैशांनी मदत करत आहे तर कोणी अन्नधान्या, वैद्यकीय गोष्टींचा पुरवठा करत आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाने (PakistaN Cricket Team) आणि बांग्लादेशने (Bangladesh) कोरोना व्हायरसच्या उद्रेकाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांच्या सरकारच्या प्रयत्नांत मोठ्या योगदानाची घोषणा केली आहे. जाणून घ्या कोण आणि कशी मदत करत आहे.

1. स्टार भारतीय शटलर पीव्ही सिंधूने गुरुवारी कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी 10 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे. सिंधूने कोविड-19 विरूद्ध लढा देण्यासाठी आंध्र प्रदेश आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्री मदत निधीसाठी प्रत्येकी पाच लाख रुपयांची देणगी दिली आहे.

2. क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालचे (सीएबी) अध्यक्ष अविशेक डालमिया यांनी पश्चिम बंगाल सरकारच्या आपत्कालीन मदत निधीसाठी पाच लाख रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. सीएबीने यापूर्वीच पश्चिम बंगाल सरकारच्या आपत्कालीन मदत निधीसाठी 25 लाख रुपयांची देणगी जाहीर केली आहे.

3. अव्वल भारतीय कुस्तीपटू आणि आशियाई सुवर्णपदक विजेता बजरंग पुनियाने कोविड-19 विरुद्ध सरकारला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणा कोरोना रिलीफ फंडामध्ये 26 वर्षीय कुस्तीगतीपटूने सहा महिन्यांचा पगार दान देण्याचं जाहीर केलं.

4. माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर यांनी दिल्ली सरकारला खासदार निधीतून 50 लाख रुपये देण्याची घोषणा केली.

5. इरफान पठाण आणि त्याचा भाऊ युसूफ यांनी 4000 मास्क दान केले आहेत. हे मास्क वडोदरा आरोग्य विभागाला देण्यात आले असून ते गरजूंना वाटून दिले जातील.

6. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी सांगितले की, केंद्रीय करारातील खेळाडूंनी एकत्रितपणे 50 लाख रुपयांची देणगी दिली तर वरिष्ठ व्यवस्थापक स्तरावरील कर्मचार्‍यांनी एक दिवसाचा पगार दान केला आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाशी (बीसीबी) करार केलेल्या 17 खेळाडूंसह एकूण 27 क्रिकेटपटूंनी अर्ध्या महिन्याच्या पगाराची देणगी दिली आहे.

7. आंतरराष्ट्रीय स्तरावर, रॉजर फेडररने बुधवारी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आपल्या 'अत्यंत असुरक्षित' स्विस देशवासियांना मदत करण्यासाठी दहा लाखाहून अधिक डॉलर्स दान केले. फेडरर आणि त्यांच्या पत्नीने कोणीही मागे राहू नये, असे सांगत दहा लाख स्विस फ्रँक (2 1.02 दशलक्ष, 943,000 युरो) दान केले.

8. अर्जेंटिना फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीनेही बार्सिलोना येथील रूग्णालयात सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस आजाराचा सामना करण्यासाठी दहा लाख युरो दान केले आहेत. मेस्सीचा माजी बार्सिलोना मॅनेजर पेप गार्डिओलानेही बार्सिलोना आधारित दुसर्‍या मोहिमेद्वारे वैद्यकीय पुरवठा आणि उपकरणे खरेदी व उत्पादन करण्यासाठी दहा लाख युरो दिले आहेत.

9. स्टार पोर्तुगाल फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो आणि एजंट जॉर्ज मेंडिस यांनीही लिस्बन आणि पोर्टोमधील रुग्णालयांमध्ये अतिदक्षता सेवा पुरवण्यासाठी दहा लाख युरो दान केले आहेत.

10. पाकिस्तानचा माजी अष्टपैलू शाहिद आफ्रिदीने आपल्या देशातील गरजूंना जंतुनाशक साबण, साहित्य आणि अन्न दान करत आहे.

यापूर्वी, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सरकारी शाळांमध्ये सुरक्षितता व सुरक्षेसाठी ठेवण्यात आलेल्या गरजू लोकांना 50 लाख रुपयांचे तांदूळ उपलब्ध करुन देण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष आणि माजी भारतीय कर्णधार सौरव गांगुली पुढे आला आहे. भारतात 600 पेक्षा अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली असून 10 जणांनी आपला जीव गमावला आहे.