सानिया मिर्झा-शोएब मलिक यांनी हसन अली आणि सामिया आरजू यांना दिली लग्नाची पार्टी, पहा Photo
सानिया मिर्झा, शोएब मलिक, हसन अली, सामिया आरजू, (Photo Credit: ha55an_ali/Instagram)

पाकिस्तान क्रिकेटचा वेगवान गोलंदाज हसन अली (Hassan Ali) याचा भारतीय मूळची सामिया आरजू (Samia Arzoo) हिच्यासह काही दिवसांपूर्वी निकाह पार पडला. हसन आणि सामियाचा निकाह दुबईच्या (Dubai) एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये पार पडला. दरम्यान, भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा (Sania Mirza) आणि तिचा नवरा पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू शोएब मलिक (Shoaib Malik) यांनी या जोडप्यास डिनर पार्टी दिली. ही लग्नानंतरची त्यांची पहिली मेजवानी (दावत) होती. हसन आणि शोएब यांच्यात चांगले संबंध आहेत. लग्नाच्या एक दिवस आधी सानियाने हसनने शेअर केलेल्या फोटोवर खट्याळ प्रतिक्रिया देत त्याला चिडवले होते. (पाकिस्तानी क्रिकेटर हसन अली आणि हरियाणाची शामिया आरजू अडकले विवाह बंधनात, पहा लग्नाचे Photos)

शोएब आणि हसन यांनी या डिनर पार्टीचा फोटो शेअर केला आहे. हसनने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याने शोएब आणि सानियाचे पार्टीनंतर आभार मानले.

 

View this post on Instagram

 

Thanks for such a delicious dinner Shoaib bhai and sania bhabi. See you soon again.#firstweddingdawat

A post shared by Hassan Ali (@ha55an_ali) on

मानव रचना युनिव्हर्सिटीतून एरॉनॉटिकल इंजिनियरिंगच शिक्षण घेतलेली आरजू तीन वर्षांपासून एअर अमीरातमध्ये काम करत आहे. याआधी ती जेट एअरवेजमध्ये होती. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्मलेल्या त्याने हसनशी तिची भेट दुबईमध्ये झाली होती. भारत-पाकिस्तानी रहिवासींचा हा विवाह सोहळा चर्चेचा विषय बनला होता. हसन हा चौथा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे ज्याने भारतीय मुलगी लग्न गाठ बांधली आहे. त्याच्या आधी झहीर अब्बास, मोहसीन खान आणि शोएब मलिक यांनीही भारतीय वंशाच्या मुलीशी लग्न केले आहे. मलिकने एप्रिल 2010 मध्ये भारतीय टेनिस स्टार सानियाशी लग्न केले होते. दुसरीकडे, माजी कर्णधार झहीर अब्बास हा भारतीय वंशाच्या मुलीशी लग्न करणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू होता. सध्याच्या काळातील प्रसिद्ध फलंदाज मोहसीन खानने भारतीय अभिनेत्री रीना रॉय हिच्याशी लग्न केले, पण नंतर दोघांनीही घटस्फोट घेतला.