भारताची मुलगी शामिया आरजू (Shamia Arzoo) आणि पाकिस्तानी गोलंदाज हसन अली (Hassan Ali) अखेर विवाह बंधनात अडकले. हसन आणि शामियाचा निकाह दुबईच्या (Dubai) एटलांटिस पाम जुबेरा पार्क हॉटेलमध्ये पार पडला. मानव रचना युनिव्हर्सिटीतून एरॉनॉटिकल इंजिनियरिंगच शिक्षण घेतलेली आरजू तीन वर्षांपासून एअर अमीरातमध्ये काम करत आहे. याआधी ती जेट एअरवेजमध्ये होती. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात जन्मलेल्या त्याने हसनशी तिची भेट दुबईमध्ये झाली होती. भारत-पाकिस्तानी रहिवासींचा हा विवाह सोहळा चर्चेचा विषय बनला होता. दोन्ही कुटुंबात साध्य उत्सवाचे वातावरण आहे. यापूर्वी या जोडप्याने त्यांचे प्री-वेडिंग शूट केले होते, यामध्ये ते दोघेही एकमेकांचे हात पकडताना दिसत होते. (पाक क्रिकेटपटू हसन अली आज होणार भारताचा जावई, दुबईमध्ये शामिल आरजू सह निकाह आधी केला Pre-Wedding फोटोशूट)
शामिया आणि हसन अली यांच्या लग्नाबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात होत्या. मात्र शामियाच्या वडीलांनी मुलीचे लग्न तर करायचे आहे. मग मुलगा भारताचा असो किंवा पाकिस्तानचा, याचा काही फरक पडत नाही. फाळणीनंतर आमचे नातेवाईक पाकिस्तानात गेले असल्याचे त्याच्याकडून स्पष्ट करण्यात आले होते. मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास दोघांचा निकाह झाला. यानंतर रात्री आठच्या सुमारास डिनर आयोजित केले होते आणि रात्री दहाच्या सुमारास विदाईचा कार्यक्रम झाला. पहा हसन आणि आरजूच्या निकाहचे काही सुंदर क्षण:
फर्स्ट लुक
हसन अलि आणि पत्नी शामिया
पाकिस्तान आणि भारत या बंधासह एकत्र!
हसन हा चौथा पाकिस्तानी क्रिकेटपटू आहे ज्याने भारतीय मुलगी लग्न गाठ बांधली आहे. त्याच्या आधी झहीर अब्बास, मोहसीन खान आणि शोएब मलिक (Shoaib Malik) यांनीही भारतीय वंशाच्या मुलीशी लग्न केले आहे. मलिकने एप्रिल 2010 मध्ये भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाशी (Sania Mirza) लग्न केले होते. आणि मागील वर्षी तिने त्यांचा मुलगा इझहान मिर्झा मलिक याला जन्म दिला. दुसरीकडं, माजी कर्णधार झहीर अब्बास हा भारतीय वंशाच्या मुलीशी लग्न करणारा पहिला पाकिस्तानी खेळाडू होता. सध्याच्या काळातील प्रसिद्ध फलंदाज मोहसीन खानने भारतीय अभिनेत्री रीना रॉय हिच्याशी लग्न केले, पण नंतर दोघांनीही घटस्फोट घेतला.