बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी टीम इंडियाचा घोषणा केली आहे. 22 ते 27 सप्टेंबरदरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन वनडे सामने होणार आहेत. पहिल्या दोन सामन्यासाठी घोषित केलेल्या संघात रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली आहे. तर टीम इंडियाचं नेतृत्व केएल राहुलकडे देण्यात आलं आहे. फिरकीपटू रविचंद्रन अश्विनची संघात वापसी झाली आहे. तर अक्षर पटेलची देखील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी निवड करण्यात आली आहे. अजित आगारकर यांनी सुरुवातीच्या दोन सामन्यांसाठी वेगळी आणि तिसऱ्या सामन्यासाठी वेगळ्या संघाची घोषणा केली आहे.
पाहा बीसीसीआय़ची पोस्ट -
Coming 🆙 next 👉 #INDvAUS
Here are the #TeamIndia squads for the IDFC First Bank three-match ODI series against Australia 🙌 pic.twitter.com/Jl7bLEz2tK
— BCCI (@BCCI) September 18, 2023
संघ निवडीनंतर कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, “आम्हाला जेव्हा-जेव्हा संधी मिळते, तेव्हा आम्ही खेळाडूंना संधी देण्याचा प्रयत्न करतो. बेंच स्ट्रेंथला काही सामने खेळण्यासाठी संधी मिळेल याची आम्हाला खात्री करायची आहे.
पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांत केएल राहुल करणार नेतृत्व
केएल राहुल (कर्णधार, यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्मा करणार नेतृत्व
रोहित शर्मा, (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, इशान किशन (यष्टीरक्षक), शार्दुल ठाकूर, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवीचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल