Rashid Khan Throws His Bat in Anger: आज मंगळवारी 25 जून रोजी अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश (AFG vs BAN)आयसीसी टी -20 विश्वचषक 2024 (AFG vs BAN T20 World Cup 2024)सुपर 8 सामना खेळला जात आहे. सामन्या दरम्यान, अफगानिस्तानच्या खेळाडूंमधे दुहेरी रन घेण्यावरून वातावरण तापल्याची दृश्य समोर आली आहेत. जेव्हा रशीद खानने नॉन स्ट्राईकवर असलेल्या करीम जनातला रन घेण्यास सांगितले. मात्र, करीम जनातने रशीदला रन घेण्यापासून रोखले. तेव्हा संतापलेल्या रशीदने त्याची बॅट मैदानावरच(Rashid Khan Throws His Bat ) फेकली. अफगाणिस्तानची फलंदाजी सुरू असताना पहिल्या डावाच्या शेवटच्या षटकात ही घटना घडली.(हेही वाचा: AFG VS BAN T20 WC: अफगाणिस्तानने बांगलादेश समोर ठेवले 116 धावांचे लक्ष्य, आता दोन्ही संघात वाढली सेमी फायनलसाठी चुरस)
तंजीम साकिबच्या चेंडूवर 'हेलिकॉप्टर' शॉट मारण्याच्या प्रयत्नात राशिदने चेंडू हवेत उंच फेकला होता. यादरम्यान रशीदने धाव पूर्ण करण्यासाठी नॉन स्ट्रायकवरच्या टोकाकडे धाव घेतली आणि आणखी एक रन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, करीम जनातने त्याला हाताने थांबण्याचा इशारा केला.
View this post on Instagram
दरम्यान, अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानला राग आला आणि त्याने जवळपास अर्धे अंतर धावल्यानंतर आपली बॅट जमिनीवर फेकली. नंतर जनातने बॅट उचलून त्याला दिली. पण रशीद करीम जनातसोबत बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो बॅट घेऊन निघून गेला.