राजकोट येथे झालेल्या रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) गटातील बी सामन्याच्या दुसर्या दिवशी सौराष्ट्रने कर्नाटकविरुद्ध चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) याने रविवारी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 13 व्या दुहेरी शतकाच्या विक्रमाची नोंद केली. पुजाराच्या या विक्रमी खेळीच्या जोरावर सौराष्ट्रने (Saurashtra) 581/7 धावांवर डाव घोषित केला. पुजाराने 248 धावा केल्या तर शेल्डन जॅक्सन याने 161 धावा फटकावत 394 धावांची भागीदारी केली. पुजाराचे रणजी ट्रॉफीमधील हे सातवे दुहेरी शतक होते. या स्पर्धेच्या इतिहासातील हे तिसरे सर्वाधिक दुहेरी शतक होते. 2017 मध्ये त्याने 12वे दुहेरी शतक झळकावत एका भारतीय खेळाडूने सर्वाधिक दुहेरी शतकांच्या बाबतीत फलंदाज विजय मर्चंट यांना मागे टाकले होते. पुजाराने या विक्रमी खेळी दरम्यान 390 चेंडूंत 24 चौकार आणि एक षटकार मारला. त्याने 66 सामन्यात हे आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या प्रकरणात तो आता संयुक्तपणे अजय शर्मा (Ajay Sharma) सोबत दुसर्या क्रमांकावर आहे. त्याच्यापुढे पारस डोगरा (Paras Dogra) आहे ज्याने 9 द्विशतकं झळकावली आहेत. (Ranji Trophy 2019-20: बिहारच्या अभिजित साकेत याने केला चेंडूने कहर, मिझोरमविरुद्ध सामन्यात एकही धाव न देता घेतल्या 7 विकेट)
शिवाय, पुजारा आधीपासूनच प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वाधिक दुहेरी शतक लागवणारा फलंदाज बनला होता. पुजाराच्या नावावर आता सर्वाधिक 13 दुहेरी शतकं आहेत. दुसरीकडे, पुजारानेही प्रथम श्रेणी क्रिकेटमधील आपले 50 वे शतक पूर्ण केले आणि 50 शतकं ठोकणार्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे. पुजारापूर्वी सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांच्यासह 9 भारतीय खेळाडूंनी ही कामगिरी बजावली आहे.
दरम्यान, विदर्भ (Vidarbh) विरुद्ध नागपुरातील सामन्यात गोलंदाजांनी वर्चस्व राखले. पहिल्या डावात बंगालला (Bengal) 170 धावांवर ऑल आऊट केल्यावर विदर्भने 3 बाद 89 धावांवर दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. कर्णधार फैज फजलने अर्धशतक झळकावले होते, तर लोअर ऑर्डरच्या योगदानामुळे विदर्भला फिरकी अनुकूल खेळपट्टीवर 212 धावा केल्या. पहिल्या डावात 42 धावांची आघाडी मिळवल्यानंतर गोलंदाजांनी बंगालला दुसऱ्या डावात 99 धावांवर ऑल आऊट केले आणि 2 दिवसांच्या आत संघाचा विजय निश्चित केला. आदित्य सरवतेने (Aditya Sarvate) सहा गडी बाद केले. विजयासाठी 58 धावांची गरज असताना विदर्भने 13.5 षटकात लक्ष्य राखून सहा गुणांची कमाई केली. त्यानंतर सरवटेने बंगालच्या फलंदाजांच्या अडचणीत वाढ केली आणि बंगालच्या फक्त दोन फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला.