हरभजन सिंह, सुरेश रैना, गीता फोगट (Photo Credits: Getty Images/ Instagram)

अयोध्येत राम मंदिराच्या (Ram Manir) पायाभरणीचा शिलान्यास सोहळा सुरु आहे. या सोहळ्यासाठी सुमारे 175 नामांकित अतिथींना आमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी केवळ अयोध्याच (Ayodhya) नव्हे तर संपूर्ण देश सजला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पाडला. अयोध्येत राम मंदिर सोहळ्यापूर्वी क्रीडापटुंनी मंदिर सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या. भारतीय क्रिकेटर सुरेश रैना, गौतम गंभीर, शिखर धवनपासून (Shikhar Dhawan) कुस्तीपटू साक्षी मलिक, बबिता फोगाट, (Babita Phogat) संगीता आणि रितूफोगाट यांनी सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या. राम मंदिर भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर माजी क्रिकेटर आणि भाजपा खासदार गंभीरने भारतीयांना एक संदेश दिला.

गंभीरने ट्विट करत म्हटले की, “नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि त्यांची दडपशाही न करणे या दोन गोष्टींमुळेच देशात ऐक्य आणि एकात्मता टिकून राहते. प्रभू रामचंद्र यांचे विचार हे प्राचीन काळापासून भारतीयांना मार्गदर्शन करत आहेत. प्रभू रामचंद्र यांचे प्रतीक असणारे न्याय, चांगुलपणा आणि समृद्धी यासारखी मूल्य आपल्यात रूजवण्यासाठी आपण सर्व भारतीयांनी परिश्रम घेतले पाहिजेत.” (Ayodhya Ram Mandir Bhumi Pujan: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी 150 कोरोनामुक्त पोलिसांची नेमणूक करण्यामागे 'हे' आहे महत्त्वाचे कारण)

गंभीरचे ट्विट

दुसरीकडे, मागील वर्षी भारतीय जनता पार्टीचा झंडा हाती घेतलेल्या बबिताने म्हटले की अयोध्या तर सुरुवात आहे, अजून बरच काही बाकी आहे.

रैनाने रामजन्मभूमी अयोध्या येथील भव्य राम मंदिराच्या पायाभरणीबद्दल देशवासियांचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्याने पुढे म्हटले की यामुळे देशात लोकांमध्ये बंधुता, शांती आणि आनंद वाढो.

'जय श्री राम', रितू फोगाटने लिहिले.

साक्षी मलिक म्हणाली, "राम हे आपले अस्तित्व आहे. राम हा आपला आराध्य आहे. राम हा आपला आत्मा आहे. श्री राम नावाचा जप केल्याने दुःख आणि इच्छा पूर्ण होतात. आजचा प्रत्येक तास शुभ आहे. संपूर्ण जग सुंदर बनले आहे."

संगीता म्हणाली आज 'जय सियारामच्या जयघोषाने संपूर्ण देश गूंजेल..'

जय जय राम

शिखर धवन

सर्वोच्च न्यायालयाने गेल्या नोव्हेंबरमध्ये 6 डिसेंबर 1992 पर्यंत बाबरी मशीद असलेल्या ठिकाणी राम मंदिर बांधण्यास परवानगी दिली होती. मुख्य न्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने 9 नोव्हेंबरला रामजन्मभूमी-बाबरी मशीद शीर्षक वादाबाबत अंतिम निकाल दिला. सर्वानुमते निर्णय घेत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने विवादित जमीन मंदिराच्या बांधकामासाठी दिली. अयोध्येत सुन्नी वक्फ बोर्डाला योग्य, प्रमुख ठिकाणी पाच एकर पर्यायी जमीन सर्वोच्च न्यायालयाने दिली.