पी. व्ही. सिंधू (फोटो सौजन्य- ANI)

भारताची शटलक्वीन पी. व्ही. सिंधू (P.V. Sindhu) ने तिच्या कारकिर्दीतील 300 वा विजय मोडीत काढत वर्ल्ड फायनल टूरच्या विजेतेपदाची मानकरी ठरली आहे. या वर्षात सिंधूला एकही विजेतेपद मिळाले नव्हते. मात्र वर्ल्ड टूरच्या विजेतेपदाची मानकरी ठरुन तिने भारताची शान वाढविली आहे.

पी. व्ही. सिंधूने वर्ल्ड टूर फायनल्स (World Tour Finals) मध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत सिंधूने अंतिम फेरीत जपानच्या नोझोमी ओकाहुरा (Nozomi Okuhara) ला हरविले असून 21-19. 21-17  अशा फरकाने हरविले आहे. तर सिंधूचे हे प्रथम  फायनल्सचे विजेतेपद मिळाले असून 2017  मध्ये तिला उपविजेती म्हणून घोषित करण्यात आले होते.

शनिवारी झालेल्या उपात्यं फेरीत रॅट्चनॉक इंटानॉन हिला सिंधूने 21-16, 25-23 अशा फरकाने हरविले आहे. तर उपात्यपूर्व फेरीमध्ये अमेरिकेच्या झँग बीवन हिला 21-9, 21-15 अशा गुणांची आघाडी करत सिंधूने तिला हरविले आहे.