PM Modi Special Thanks Rahul Dravid: 'अतुलनीय कोचिंग कौशल्यामुळे यशाला आकार मिळाला'; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राहूल द्रविडचे कौतुक, एक्सवर पोस्ट शेअर
Photo Credit -X

PM Modi Special Thanks Rahul Dravid: टी-20 विश्वचषकात अंतिम सामन्यात (IND vs SA T20 World Cup 2024 Final) भारताने विजय मिळवला. त्यानंतर संघाचे सर्वच खेळाडू मैदानावर भावूक झालेले पहायला मिळाले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Modi) यांनी टीम इंडियाचे कोच राहूल द्रविड(Rahul Dravid) याचे कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट केली की, 'राहुल द्रविड यांच्या अतुलनीय कोचिंग कौशल्याने भारतीय क्रिकेटच्या यशाला आकार मिळाला. त्यांचे अतूट समर्पण, धोरणात्मक अंतर्दृष्टी आणि योग्य प्रतिभेचे पालनपोषण यामुळे संघाचा कायापालट झाला आहे'.

त्यांनी पुढे असे लिहिले की,' त्यांच्या योगदानाबद्दल आणि पुढच्या पिढ्यांना प्रेरणा देणाऱ्यासाठी भारत त्यांचा आभारी आहे. त्यांच्या कोचिंगमध्ये भारत विश्वचषक जिंकताना पाहून आनंद होत आहे. त्यांचे अभिनंदन'.

पहा पोस्ट-

बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल येथे अंतिम सामना खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने चमकदार कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा 7 धावांनी पराभव करत दुसऱ्यांदा आयसीसी टी-20 विश्वचषकावर आपले नाव कोरले. खेळाडूंनी भारताची मान उंचावली. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने 20 षटकांत 7 गडी गमावून 176 धावा केल्या. या विजयानंतर सर्वच खेळाडू मैदानावर भावूक झालेले पहायला मिळाले. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे कोच राहूल द्रविड याचे कौतुक केले आहे.