पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज (27/2/2019) दिल्लीतील विज्ञान भवनाच्या नॅशनल युथ पार्लियामेंट फेस्टिवल 2019 दरम्यान खेलो 'इंडिया अॅप' Khelo India App) लॉन्च केला. यावेळेस राज्यमंत्री राज्यवर्धन सिंह राठोर (Rajyavardhan Singh Rathore) ही उपस्थित होते. राज्यवर्धन सिंह राठोर यांनी सांगितले की, "मोबाईल अॅपच्या माध्यामातून अनेक युवा खेळाडू देशातील सर्व मैदाने, खेळांचे नियम या विषयी माहिती मिळवू शकतात. तसंच ते आपला फिटनेस चेक करु शकतात. स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया (SAI) ने या फिटनेस अॅपची निर्मिती केली असून हे पहिलेच स्पोर्ट्स अॅप आहे."
देशातील तरुणांमध्ये फिटनेस आणि खेळाप्रती जागृकता निर्माण करणे, हे या अॅपमागील प्रमुख हेतू आहे. हे अॅप देशातील खेल चॅम्पियन मॅपिंगचे उद्देश पूर्ण करते. खेलो इंडिया अॅपमध्ये देशभरात खेळ सुविधांबद्दलही सविस्तर माहिती मिळेल. तसंच याद्वारे तरुण आपल्या आवडीच्या खेळाला प्रारंभ करु शकतात.
लहान मुलांचे फिटनेस असेसमेंट हे या अॅपचे खास फिचर आहे. याद्वारे भारतीय शाळेय विद्यार्थी, 5 वर्ष आणि त्याहून अधिक वयाची सर्व मुले बेसिक फिटनेस लेव्हल मॅप करु शकतील. तसंच या अॅपद्वारे भविष्यातील चांगल्या खेळाडूंची माहिती मिळेल. खेलो इंडिया अॅप तुम्ही प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करु शकतात.