(Photo Credit: Twitter)

अमेरिकेत खेळल्या जाणार्‍या नॅशनल बास्केटबॉल लीग, एनबीए (NBA) सामने पहिल्यांदा भारतात होत आहे. शुक्रवारी हे सामने सुरू होण्यापूर्वी नीता अंबानी यांनी मॅचमध्ये खेळला जाणारा बॉल मुंबईत सादर केला. रिलायन्स फाऊंडेशनच्या (Reliance Foundation) नीता अंबानी (Neeta Ambani) यांनी हा बॉल एनबीए अधिकाऱ्यांना दिला. भारतात एनबीए लीग आणि रिलायन्स फाऊंडेशन त्यांच्या भागीदारीची 6 वर्षे पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत आहेत. पहिल्या सामन्यात इंडियाना पेसर्सने (Indiana Pacers) सॅक्रॅमेन्टो किंग्ज (Sacramento Kings) चा 132-1131 असा पराभव केला. या मॅचपूर्वी उद्घाटन बॉल भारतामधील त्यांच्या पहिल्या सामन्याच्या स्वागत चिन्हाच्या रूपात सादर करण्यात आला होता. रिलायन्स फाऊंडेशनने भारतातील जुनिअर एनबीए कार्यक्रम चालविते आणि यात 20 राज्यांमधील 34 शहरांमधील 1.10 कोटी मुले सहभागी आहेत. या कार्यक्रमांतर्गत मुलांना बास्केटबॉलशी जोडून निरोगी आणि सक्रिय जीवनशैली जगण्यास प्रोत्साहित केले जाते. (मुंबई मध्ये पहिल्या NBA गेम्ससाठी तयारीला सुरुवात, अरबी समुद्रात भारतातले पहिले Floating Basketball Court सुरू)

रिलायन्स फाऊंडेशनच्या एजुकेशन फॉर ऑल आणि स्पोर्ट्स मोहिमेअंतर्गत एनबीएतर्फे मुंबईतील 70 रिलायन्स फाऊंडेशन ज्युनियर एनबीए स्कूलमधील 3000 मुले-मुलींना सॅक्रॅमेन्टो किंग्ज आणि इंडियाना पेसर्स यांच्यातील सामना पाहणार मिळणार आहे. यावेळी निता अंबानी म्हणाल्या, 'भारताला बहु-क्रीडा राष्ट्र बनत आहे हे पाहणे माझे स्वप्न आहे. रिलायन्स फाऊंडेशन भारतात प्रथमच एनबीए सामने आणण्यासाठी आणि एनबीएबरोबरची 6 वर्षांची भागीदारी साजरा करण्यासाठी उत्साहित आहे. मुलांमध्ये शिक्षण आणि खेळाला प्रोत्साहन देणे हे माझे ध्येय आहे आणि आशा आहे की भारत एक दिवस खेळाच्या शिखरावर असेल."

भारतातील पहिला एनबीए सामना खूप रोमांचक होता. इंडियाना पेसर्स आणि सॅक्रॅमेन्टो किंग्ज यांच्यातील सामना ओव्हर-टाइम पर्यंत खेळला गेले आणि अखेरीस इंडियाना पेसर्सने 132-131  असा विजय मिळवाल.