मुंबई मध्ये पहिल्या NBA गेम्ससाठी तयारीला सुरुवात, अरबी समुद्रात भारतातले पहिले Floating Basketball Court सुरू
फ्लोटिंग बास्केटबॉल कोर्ट (Photo Credit: ANI)

नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन (NBA) ने बुधवारी पहिल्यांदा वांद्रे-वरळी सीलिंकजवळ अरबी समुद्रात फ्लोटिंग बास्केटबॉल कोर्ट (Floating Basketball Court) भारतात आणले. काही क्रीडा प्रेमी एनबीएचे दिग्गज जेसन विल्यम्स (Jason Williams) यांच्यासह या नवीन फ्लोटिंग कोर्टचा आनंद घेत होते. एनबीए इंडियाने 20 डिसेंबर 2018 रोजी जाहीर केले की देशातील पहिला एनबीए खेळ ऑक्टोबरमध्ये मुंबईत होईल. एनबीए इंडिया गेम्स 2019 मध्ये सॅक्रॅमेन्टो किंग्ज आणि इंडियाना पेसर्स हे संघ सहभागी होतील आणि 4 आणि 5 ऑक्टोबर रोजी डोम, एनएससीआय, एसव्हीपी स्टेडियमवर दोन प्री-सीझन खेळतील. नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनचे महान जेसन विल्यम्स यांचा असा विश्वास करतात की भारतात बास्केटबॉलच्या विकासाची मोठी क्षमता आहे आणि मुंबईत खेळल्या जाणार्‍या दोन प्री-सीझन गेममुळे हा खेळ लोकांपर्यंत नेण्याची प्रक्रिया अजून वेगाने होईल.

फ्लोटिंग कोर्टाबद्दल विल्यम्स म्हणाले की, शहरात जास्त बास्केटबॉल कोर्ट नसल्यामुळे असे आणखीन कोर्ट बनवण्यास सांगण्यात आले आहे. ते पुढे म्हणाले की, कदाचित एखादा फ्लोटिंग कोर्ट सुरुवात असेल. आपल्या लोकांना येथे अधिक कोर्टची आवश्यकता आहे. मी इथे कुठेही बरीच पार्क्स किंवा मैदानी कोर्ट पहिले नाही."

अमेरिकन लीगचे संघ प्रथमच भारतात एनडीएचे सामने खेळणार आहेत. 5 ऑक्टोबरला होणार्‍या या सामन्यासाठी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात तिकिटे विकली गेली आहे. रिलायन्स फाऊंडेशन जुनिअर एनबीए कार्यक्रमांतर्गत येणाऱ्या 70 शाळांमधील 3,000 मुले देखील हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असतील. प्री-हंगाम सामने सायंकाळी 6.30 वाजता सोनी टेन-1 आणि टेन-3 वर प्रसारित केले जातील.